एका कथित डॉक्टराने सोशल मीडियावर पत्रकारांची प्रतिमा मलिन करत करणारी पोस्ट व्हायरल केल्याने त्यावर कारवाईची मागणी!
झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया
पाचोरा (झूम मराठी) पाचोरा शहरातील वृंदावन मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलचे संचालक डॉ निळकंठ नरहर पाटील यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सोशल मीडियावर पाचोरा तालुक्यातील”काही प्रमुख राजकीय व्यक्ती व काही तोडी पाणी वाले पत्रकार” असा शब्द प्रयोग करून सोशल मिडीयाच्या वॉट्सअप पोस्ट प्रसारीत केल्याने तालुक्यातील सर्व पत्रकारांनी त्यावर आक्षेप नोंदत कारवाई व्हावी अशी भूमिका स्पष्ट करत निवेदन देण्यात आले.
काय होती ती वायरल पोस्ट

सदर प्रकरणी दि.6 फेब्रुवारी 2023 सोमवार रोजी पत्रकारांची बैठक होऊन यात सदर डॉक्टर विरोधी पो. स्टे. ला तक्रार देण्याचा सदरचा निर्णय घेऊन निषेध नोंदवण्यात आला व सन्मानिय डॉ. निळकंठ पाटील यांच्याकडे कोणत्याही पत्रकाराने तोडी- पाणीसाठी प्रयत्न केला असेल अथवा वारंवार प्रतिमा मलिन करत असतील किंवा प्रयत्नात असतील तर त्याचीही दखल घेऊन संबधित दोषीवर योग्य ती कायदेशिर कार्यवाही व्हावी सोबतच पाचोरा पो.स्टे. ला दि 1 फेब्रूवारी 2023 रोजी फुलचंद बडगुजर यांनी आपल्या मुला संदर्भात योग्य त्या कागदपत्रांच्या आधारे वृंदावन हॉस्पिटल संचालकां विरोधात पाचोरा पो.स्टे. ला तक्रार अर्ज दिला असुन त्या अर्जाची देखील सखोल चौकशी होऊन दोषीवर दि.15 फेब्रुवारी पावेतो गुन्हा दाखल व्हावा अन्यथा दि.16 फेब्रू. पासुन लोकशाही मार्गाने आंदोलनाचा पावित्रा घेणार असल्याचे 30 पत्रकारांच्या सहया असलेले निवेदन वजा तक्रार अर्ज पाचोरा पो. स्टे.ला देण्यात आला आहे.


