आपल खान्देशमहाराष्ट्र

गोंद्री येथे होणाऱ्या ऐतिहासिक कुंभमेळाव्यास समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे- राहुल राठोड

शहरअध्यक्ष विजेएन टी सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राहुल प्रेमाभाऊ राठोड यांचे आव्हान


जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोंद्री येथे 25 ते 30 जानेवारी दरम्यान अखिल भारतीय गोर बंजारा समाजाच्या कुंभ मेळाव्याचे आयोजक केले असून बंजारा समाज केंद्रस्थानी असलेल्या या मेळाव्याला देशभरातून शंभरहून अधिक संत महंत व देशातले नेतेमंडळी विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत या मेळाव्यात राज्यभरातून लाखो समाज बांधव येणार असून पाचोरा – भडगाव तालुक्यातील बंजारा समाज बांधवांनी या महामेळाव्यास बहुसंख्येने सहभागी होऊन इतिहासिक साक्षीदार व्हावे असे आवाहन शहर अध्यक्ष राहुल प्रेमाभाऊ राठोड यांनी केले आहे.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोंद्री येथे 25 ते 30 जानेवारीदरम्यान अखिल भारतीय गोर बंजारा समाजाच्या कुंभमेळाव्याचे आयोजन केले आहे दरम्यान या महामेळाव्यास देशभरातून शंभरहून अधिक संत महंतांची उपस्थिती लाभणार आहे समाजांच्या विकासासाठी या मेळाव्यातून प्रबोधन केले जाणार आहे हा मेळावा ऐतिहासिक तक्ता न भूतो न भविष्याती होणार असून हा मेळावा यशस्वी करण्यासाठी समाज बांधव दिवस रात्र प्रयत्न करीत आहे या ऐतिहासिक अशा महामेळाव्याचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातून गोर बंजारा समाज बांधव उपस्थित राहणार आहेत या अनुषंगाने पाचोरा भडगाव बंजारा समाज बांधवांनी उपस्थित राहावे राहुल राठोड यांनी महा कुंभ मेळाव्यात सहभागी होण्याचे समाज बांधवांना आवाहन केले आहे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे