आपल खान्देश

बेफिकीर – पाचोरा शहरात भर दिवसा पथदिवे सुरू..

झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया

प्रशासनाचा भोंगळ कारभाराचा नमूना पाचोरा शहरवासीयांना पुन्हा एकदा आला आहे. शहरातील देशमुखवाडी बाहेरपुरा, बाजारपट्टा, कृष्णापुरी या भागात पथदिवे दिवसाही सुरूच असतात. पथदिवे रात्री सुरु व दिवसा बंद करणे अपेक्षित असते.

शहरातील अनेक भागात पथदिवे बंद असताना संबंधित ठेकेदार दिवे बदलण्याची तसदी घेत नसताना दुसरीकडे मात्र दिवसा सुरू असलेले पथदिवे बंद होत नसल्याने विनाकारण विजेचा अपव्यय होत आहे. याबाबत पालिकेच्या वीज कंपनीच्या अधिकार्‍यांनी त्वरित दखल घ्यावी

राष्ट्रीय ऊर्जेचे संवर्धन करण्याचे संदेश सातत्याने लोकांच्या मनावर बिंबवले जातात. परंतु पथदिवे असे कित्येक दिवस रात्र सुरू राहत असल्याने त्याला नेमके जबाबदार कोण? याचा शोध घेऊन संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे