आपल खान्देशमहाराष्ट्र

कृतिशील युवानेता सर्व युवकांचा युवा योद्धा नंदूभाऊ शेलार

जीवाला जीव देणारे कार्यकर्त्यांचे प्रेम पाहता नंदूभाऊ शेलार पाचोरा नगरपालिकेत नव्या राजकीय समीकरणातील आश्वासक तरुण चेहरा ठरतील.

एका संवेदनशील आणि सामाजिक भान असणा-या कृतिशील समाजसेवक नंदूभाऊ शेलार यांचा आज वाढदिवस आहे. अगदी कमी वयात नंदू शेलार यांनी आपले सामाजिक भान दाखवत उद्याच्या नेतृत्वाची चुणूक दाखविली आहे. सामाजिक व राजकारणाचा वारसा नसतांना त्यांनी प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीत स्वत:च्या ध्येयासाठी लढण्याची धमक आणि अस्तित्व राखण्यासाठी कष्ट करण्याची, कार्यकर्ते फक्त जोडायचेच नाहीत, तर ते टिकवण्याची शिकवणही वडिलांकडूनच मिळाली असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच आग्रही असणा-या समाजसेवक नंदू शेलार यांना वाढदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा..

आपली धडाकेबाज कर्तव्यतत्परता, कृतिशील आक्रमकता, निर्णय होईपर्यंत समस्यांचा केला जाणारा पाठपुरावा, नागरी समस्यांचे निराकरण करताना त्यासाठी उपलब्ध करून दिलेले पर्याय, अशा सर्वच पातळीवर केलेले कार्य वेगळे आणि दखलपात्र ठरावे. गणपती उत्सवात पूजेचे-निर्माल्या संकलन असो आणि तालुकास्थरीय क्रिकेट ट्रनामेंट सामने भरवणे तसेच “नंदू शेलार युवमंचाच्या” माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत, नंदू शेलार यांना मी तसं पाहतोय ते सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन त्याच बरोबर एका संवेदनशील आणि सामाजिक भान असणा-या कृतिशील राजकीय नेत्याची आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अगदी कमी वयात यांनी आपले सामाजिक भान दाखवतानाच उद्याच्या नेतृत्वाची चुणूक दाखविली आहे. समाजमाध्यमांमध्ये नंदू शेलार सर्वात अधिक सक्रिय असणारे युवानेते आहेत. त्यांच्या एका हाकेला हजारोंच्या संख्येने युवकांचा प्रतिसाद असतो , तर संपूर्ण पाचोरा तालुक्याच्या जनतेने, खासकरून युवावर्गाने जणू शिक्कामोर्तबच केल्याचे स्पष्ट होत आहे.

नंदूभाऊ शेलार यांचा आजवरचा सामाजिक प्रवास, अचूक निर्णय क्षमता आणि त्यांच्या एका हाकेस शेकडोशी युवकांची फळी त्यांच्या पाठीशी जमा होणारे, जीवाला जीव देणारे कार्यकर्त्यांचे प्रेम पाहता नंदूभाऊ शेलार पाचोरा नगरपालिकेत नव्या राजकीय समीकरणातील आश्वासक तरुण चेहरा ठरतील.

लेखन-दिलीप जय परदेशी

संपादक झूम मराठी व पाचोरा लाईव्ह

9022764411 – 9987102625

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे