आपल खान्देश

पाचोरा : ‘आनंदाचा शिधा’ : कुठे वाटप कुठे प्रतीक्षा, शिधापत्रिकाधारकांच्या पदरी निराशा.

पाचोरा (प्रतिनिधी) दिवाळीमध्ये गरजूंसाठी शंभर रुपयांमध्ये राज्य सरकारकडून आनंदाचा शिधा देणार अशी घोषणा सरकारने केलेली होती. मात्र दिवाळी सुरु झाल्यानंतरही पाचोरा तालुक्यात अद्यापपर्यंत या वस्तू पुरेशा उपलब्ध झाल्या नसल्याचं समोर आलं आहे. पाचोरा तालुक्यात काही ठिकाणी हे किट पोहचल्या आहेत तर काही ठिकाणी अद्याप प्रतिक्षेतच आहेत.  20 तारखेपर्यंत या वस्तू लोकांपर्यंत पोहोचतील अस आश्वासन पाचोरा पुरवठा विभागाने दिलं होतं.

शिधा किट पाचोरा भडगाव तालुक्याtil🙏काही रेशन दुकानांमध्ये वाटप होत असल्याचा दावा जिल्हा व शहर पुरवठा विभागाने केला आहे. ‘आनंदाचा शिधा संच’ १९ आणि २० ऑक्टोबरपर्यंत सर्व रेशन दुकानांवर पोहचवण्यात येईल आणि त्यानंतर या वस्तूंचे वाटप करण्यात येईल, असे पुरवठा मंत्र्यांनी मंगळवारी जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर याबाबतची माहिती घेतली असता शहरातील मोजक्याच दुकानात हे संच पोहचल्याचे निदर्शनास आले. शुक्रवारपासून दिवाळीला सुरुवात झाली आहे. शिधापत्रिकाधारक जवळच्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये याबाबत चौकशी करत आहेत. काही ठिकाणी तेल फक्त पोहचले आहॆ पूर्ण संच पोहचले नसल्याची माहिती आहे. सर्व साहित्य आल्यावरच वाटप केले जाईल सांगण्यात येत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. पाचोरा शहरातील रेशन दुकानात संचातील काहीच साहित्य पोहचले होते.

आज पत्रकार परिषद घेऊन स्थानिक आमदार किशोर पाटील यांनी प्रशासन तांत्रिक अडचणी मुळे शिधा किट वितरण करू शकले नाहीत तरी नागरिकांना लवकरच आनंदाचा शिधा मिळेल अशी ग्वाही दिली.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे