मोकाट पशुधन धारकांनी आपल्या पशुधनाकडे लक्ष्य ठेवावे, योजना पाटील यांचे आवाहन
झूम मराठी | डिजिटल
भडगांव (प्रतिनिधी) : शहरात बरेच पशुधन धारक आपली गुरेढोरे मोकाट सोडून देतात. सायंकाळी परत येतात की नाही ही दक्षता घेत नाहीत. असाच एक प्रसंग असा की, जयहिंद कॉलनी परिसरात पाच दिवसांपूर्वी एका गाईने वासरास जन्म दिला. रात्र झाली तरी कोणी तपास केला नाही. परिसरातील डॉ.सुनिल पाटील, पत्रकार सुधाकर पाटील, निलेश पाटील सह रहिवाशांनी पो.स्टे.दक्षता अध्यक्षा नगरसेविका योजना पाटील यांचेशी संपर्क केला. प्रसंगावधान राखून त्यांनी शहरातील सोशल मिडियावर माहिती दिली. परंतु पशुधनधारक न आल्याने रात्री सदर गोमाता व वासराची काळजी घेण्यासाठी अशोक धनगर, डॉ.शैलेश धनगर यांचेकडे पाठविले. आज पशुधनधारक चंदू तेजराव जोशी यशवंतनगर यांचे ताब्यात गोमाता व वासराची योजना पाटील यांनी सहृदयपुर्वक पूजा आरती करून सुपूर्त केले. आपल्या मोकाट पशुधनावर वेळीच लक्ष्य ठेवा तसेच दक्षता काळजी घेण्याचे आवाहन योजना पाटील यांनी केले आहे.




