गुन्हेगारी

शिरपूर तालुक्यात दोन गावठी कट्ट्यासह एकास जेरबंद केले

शिरपूर(प्रतिनिधी) तालुक्यातील वाघाडी येथून धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन गावठी कट्ट्यासह एकासजेरबंद करीत 4 जिवंत काडतुससह 57 हजराचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई शनिवारी सकाळी केली असून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहिती धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना शनिवारी सकाळी मिळल्यावरून एलसीबीच्या पथकाने शोध घेतला असता वाघाडी गावातील वाडी रस्त्यावरील अश्विनी बिअरबार समोर रस्त्यावर संशयित मिळून आल्याने त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात 50 हजार रुपये किमतीचे दोन गावठी पिस्टल 2 हजार रुपये किमतीच्या 4 काडतुस व मोबाईल असा 57 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करीत संशयित सुखराम रेतम पवार वय 23 रा. मु.पो. रायचुल, ता. पानसेमल जि. बडवाणी यास ताब्यात घेऊन अटक केली आहे. याप्रकरणी एलसीबीचे पोकॉ महेंद्र सपकाळ यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक, धुळे प्रशांत बच्छाव,यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे