ब्रेकिंग

धुळ्यातील हिरे मेडिकल सिव्हिल हॉस्पिटल येथे अस्वच्छतेचे थैमान

झूम मराठी न्यूज नेटवर्क

धुळे (झूम मराठी) शहराजवळील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून रूग्ण उपचारासाठी मोठ्या संख्येने येतात. रुग्णांना वेळेवर उपचार, सेवा आणि स्वच्छता असली की रूग्ण बरा व्हायला वेळ लागत नाही. परंतू हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार वेळेवर मिळत असले तरी सेवा आणि स्वच्छतेचे मात्र तीन तेरा वाजले आहेत.

रूग्णालयातील जवळपास प्रत्येक वार्डात आणि आवारात अस्वच्छतेचे थैमान माजले आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांचा तर मनमानी कारभार सुरू आहे, महत्वाचे म्हणजे कर्मचारी अधिकाऱ्यांना न जुमानता दादागिरीची भाषा करू लागल्याने कर्मचाऱ्यांसमोर अधिकारीही हतबल झाल्याचे म्हटले जात आहे. हिरे मेडिकल कॉलेजच्या सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांकरीता आजाराच्या स्वरूपानुसार वेगवेगळ्या स्वतंत्र वार्डामध्ये सोय केलेली आहे. परंतू रूग्ण उपचार घेत असलेल्या वार्डाच्या लगत घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने रुग्णांवर एकीकडे उपचार आणि दुसरीकडे अस्वच्छतेमुळे रोगराईचे वातावरण दिसून येते आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांची तर काम करण्याची मानसिकता खराब झाली आहे. कारण अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या सुचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचे काम केले जाते आहे. डिन ऑफीससमोर कर्मचाऱ्यांची गर्दी! हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील प्र. अधिष्ठाता डॉ. अरूण मोरे यांच्या कार्यालयासमोरील जागेत स्वच्छता कर्मचारी गर्दी करतात आणि एकत्र येवून गप्पा मारतात. परंतू रूग्णालयातील अस्वच्छतेकडे ढुंकूनही बघत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरल्यामुळे रुग्णांसह सोबत आलेल्या सामान्य नागरिकांच्याही आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे. असे रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक सांगतात.

राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा हस्तक्षेप, काही कर्मचाऱ्यांची अरेरावी इतकी वाढली आहे की, ते कोणालाही जुमानत नाहीत. काही स्वच्छता कर्मचाऱ्यांनी आपल्या जागेवर इतर खाजगी कामगारांना लावून काम करून घेवू लागली आहेत. असाही गंभीर आरोप जाणकारांनी केला आहे. एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्ता व इतर १२ कर्मचाऱ्यांनी कामा ठेका घेतल्याने लाखोंची बील काढली जातात, परंतू स्वच्छतेचे काम मात्र होत नाही. स्वच्छतेच्या कामात हस्तक्षेप करणारा राजकीय पक्षाचा तो कार्यकर्ता कोण? याबाबत रूग्णालय परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई व्हावी. उपचार घेण्यासाठी रूग्ण आल्यानंतर त्यांच्या सोबत नातेवाईकही येत असतात. रूग्णाचे नातेवाईकांकडूनही खाद्य पदार्थांचे रॅपर, प्लास्टिक कॅरी बॅग्ज, प्लास्टिक ग्लास, लहान डिश वार्डाच्या बाहेर उपयोग झाल्यानंतर तशाच भिरकावून देण्यात येतात. यामुळे साचलेल्या कुजलेल्या अन्नाची तसेच इतर टाकावू वस्तूंमुळे दुर्गंधी सुटते. स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांवरही रुग्णालय प्रशासनाने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला पाहिजे. तेव्हाच परिसरातील अस्वच्छतेवर नियंत्रण मिळविता येणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे