महाराष्ट्र
राज ठाकरेंनी मनसैनिकांना केलं ‘हे’ आवाहन
‘माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो…” राज ठाकरेंनी मनसैनिकांना केलं ‘हे’ आवाहन
माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो… माझ्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर आपणा सर्वांना नम्र आवाहन!#महाराष्ट्रसैनिक #लढाकोरोनाशी #MaharashtraFightsCorona pic.twitter.com/aCx1f4m3uW
— Raj Thackeray (@RajThackeray) June 11, 2021
मुंबई, 11 जून: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 14 जूनला वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर सर्व मनसैनिकांना आवाहन केलं आहे. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर पत्र लिहून त्यांनी हे आवाहन केलं आहे. सध्या कोरोनाच्या संकटात वाढदिवस साजरा करणं मनाला पटत नाही. तसंच आपण सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे, बाहेर प्रवास करणं टाळावा. त्यामुळे मला शुभेच्छा देण्यासाठी घरी येऊ नका अशी विनंती राज ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे.

