आपल खान्देश
पाचोरा तालुक्यातील सारोळागावात झाडामध्ये अवतरले गणपती बाप्पा….
परिसरातील भाविकांची पाहण्यासाठी होतेय गर्दी...
पाचोरा (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्य़ातील पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द येथील नवनाथ महाराजांच्या मंदिराच्या आवारात अनेक वर्षांपासून लिंबाच्या झाडामध्ये बाप्पा आवतरल्यासारखे चित्र हुबेहुब या झाडांमध्ये दिसुन येत आहे.
लिंबाच्या झाडामध्ये गणपतीसारखा आकार व चक्क सोंडही असल्याने या झाडाची गावातील व परिसरातील भाविक भक्तिभावाने येऊन पूजा करतात. बऱ्याचदा आपण मिरची ,वांगे ,नारळ, बटाटा आदी मध्ये गणेशाची प्रतिकृती आपण पाहिली आहे. परंतु चक्क भल्यामोठ्या लिंबाच्या झाडांमध्ये गणरायाची प्रतिकृती दिसत आहे त्यामुळे हा विषय परिसरात चर्चेचा आणि कुतूहलाचा ठरला आहे.त्यामुळेच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.




