ब्रेकिंग
आदित्य ठाकरेंचे फोटो वापरून फसवणूक करणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल..
मुंबई (वृत्तसेवा) शिवसेनेचे नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे सध्या शिवसेनेच्या उभारणीसाठी राज्यभर दौरे करीत आहेत. यातच आदित्य ठाकरेंचा फोटो वापरून लोकांची फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. आदित्य ठाकरे यांच्या नावाने लोकांची फसवणूक करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध दादर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू असल्याची माहिती आहे.
माहितीनुसार, व्हॉटसअप प्रोफाईल पिक्चरवर आदित्य ठाकरे यांचा फोटो लावून लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





