पाचोरा-जामनेर पीजे रेल्वे नॅरोगेज ते ब्रॉडगेज साठी 955 कोटी केंद्र सरकार देणार.
पाचोरा(झूम वृत्तसेवा) पाचोरा जामनेर पी.जे.रेल्वे मार्ग नॅरो गेज ते ब्रॉडगेज साठी 955 कोटी रुपये मंजूर केले आहे. केंद्र शासनाने निधी मंजूर करून पाचोरा जामनेर रेल्वे पीजे मार्ग हा बोदवडपर्यंत नेण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. केंद्र सरकारने हा मार्ग नूतनीकरणाचा घोषणा केली. असल्याने या सर्व संघर्ष व पाठपुराव्यासंदर्भात रेल्वे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत खासदार उन्मेश पाटील यांनी पाचोरा येथील पत्रकार परिषदेत सांगितले.

पीजे रेल्वे गाडी बंद पडू नये यासाठी सर्वपक्षीय पाचोरा पी.जे.रेल्वे कृती समिती पदाधिकाऱ्यांनी सातत्याने खासदार उन्मेश पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने खासदार उन्मेश पाटील यांनी सर्वपक्षीय पी.जे.रेल्वे कृती समिती पदाधिकाऱ्यांची सन्माननीय रेल्वेमंत्री व रेल्वे जनरल मॅनेजर यांची भेट घेऊन कुठल्याही परिस्थितीत हा रेल्वे मार्ग बंद होणार नाही. याची शाश्वती देत भक्कम पाठपुरावा केला होता. या अनुषंगाने केंद्र सरकारने हा मार्ग नूतनीकरणाचा घोषणा केली. असल्याने या सर्व संघर्ष व पाठपुराव्यासंदर्भात रेल्वे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत खासदार उन्मेश दादा पाटील आज तिन वाजता पाचोरा पी.जे.रेल्वे प्रवासी निवारा येथून पत्रकारांशी संवाद साधला.





