नांदगाव ( प्रतिनिधी ) – नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील बोलठाण, रोहिले बुद्रुक येथील ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा संपन्न होणार असून गावातील सर्व ग्रामस्थांनी हजर राहण्यासाठी नोटीस द्वारे प्रसिद्ध बोलठाण रोहिले ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक त्यांनी नोटीस द्वारे प्रसिद्ध केले आहे.
शासनाच्या आदेशान्वये दिनांक 16 नोव्हेंबर 2021 रोजी मंगळवारी ग्रामसभा येण्याचे आदेश असल्याने ही ग्रामसभा जनतेपासून माझ्याकडे तीन ग्रामपंचायती असल्याने तिन्ही गावांमध्ये मी स्वतः हजर राहू शकत नाही. त्यामुळे च्या ग्रामपंचायतीला शिक्षक व उपलब्ध असलेला दुसरा कर्मचारी ( अधिकारी) ग्रामसभेमध्ये सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
या ग्रामसभा मध्ये प्रधानमंत्री आवास घरकुल योजना डचे यादीसंदर्भात मंजुरी घेण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे मात्र ग्रामसभेतून या याद्या मंजूर करून घेण्यात येणार आहे. असे समजले.. यासंदर्भात प्रधानमंत्री आवास घरकुल योजना ची ड पत्रक यादी शासनाच्या नियमानुसारच मंजूर करण्यात यावा ग्रामसभेमध्ये वाद-विवाद भांडणे होण्याचा संभव असतो म्हणून शासनाने त्यांच्या निकषानुसार या मंजूर करून घेण्यात आले ग्रामसभेत गावामध्ये वाद निर्माण होईल हा हेतु लक्षात घेऊन सदर लाभार्थ्यांची रेशन कार्ड आधार कार्ड मतदान कार्ड, बँकेतील त्यांच्या खात्यावरील डिटेल चेक करून हो सातबारा उतारे पाहून प्रधानमंत्री आवास घरकुल यादी ड पत्रक मंजूर करण्यात यावी अशी मागणी नांदगाव तालुक्यातील सविधान आर्मी चे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याकडून होत आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा