देश-विदेश

दिल्ली: ओवैसींच्या घरावर हल्ला; हिंदू सेनेच्या पाच जणांना अटक

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या घराची तोडफोड झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेले पाचही जण हे एका संघटनेशी संबंधीत कार्यकर्ते आहेत.

आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या असदुद्दीन ओवैसी नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या अशाच एका वक्तव्याचा राग आल्याने हिंदु सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी ओवैसी यांच्या घराची तोडफोड केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेची माहिती मिळताच काही लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. काही लोक ओवैसी यांच्या दिल्ली निवासस्थानाची तोडफोड करत असल्याचा फोन आल्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली.

फोन आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सर्व आरोपींना घटनास्थळावरून ताब्यात घेतले. कर्मचारी पोहचेपर्यंत त्यांनी त्यांच्या घराचे प्रवेशद्वाराचे आणि खिडक्यांचे नुकसान केले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे