विनायक मिटे यांचा अपघात नसून घातपात, अपघाताची चौकशी झालीच पाहिजे ; कार्यकर्त्यांची मागणी..
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ही घटना घडली आहे. त्यांच्या निधनानंतर सर्वस्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. विनायक मेटे यांच्या अपघाती निधन झाल्यानंतर, आता बीडमध्ये कार्यकर्त्यांनी एकच आक्रोश केला आहे. बीड नगरपालिकेचे नगरसेवक दत्ता गायकवाड हे विनायक मेटे यांचे कट्टर समर्थक आणि कार्यकर्ते समजले जातात. त्यांनी आज शिवसंग्राम भवनमध्ये एकच आक्रोश करत हंबरडा फोडला आहे. दरम्यान आमदार विनायक मिटे यांचा अपघात नसून घातपात झाल्याचा संशय कार्यकर्त्यांनी व्यक्त केला असून या अपघाताची चौकशी झालीच पाहिजे. अशी मागणी देखील यावेळी कार्यकर्त्यांनी केली आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवर हा अपघात झाला असून पहाटे 5:30 वाजता भातान बोगद्याजवळ ही घटना घडली. मेटे यांच्या गाडीला अनोळखी वाहनाला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचा पुढील भाग चक्काचूर झाला आहे. तसेच अपघात झाला तेव्हा विनायक मेटे यांचा मुलगा गाडी चालवत असल्याचंही सांगितलं जातं आहे. अपघातात त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान उपचारादरम्यान मेटे यांचं निधन झालं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. विनायक मेटे यांच्या झालेल्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला मोठा हादरा बसला आहे.
विनायक मेटे यांच्या अपघाताच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या घटनेच्या तपासासाठी रायगड पोलिसांच्या आठ टीम तयार करण्यात आल्या आहेत. शासन विनायक मेटे यांच्या परिवारासोबत आहे. त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.



