महाराष्ट्रराजकीय

सोमवारची सुनावणी लांबणीवर; शिवसेना सत्तासंघर्ष प्रकरणाची सुनावणी १२ ऑगस्टला..

मुंबई (उदय नरे) शिवसेना नेमकी कोणाची यावर सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्षाची सुनावणी होणार होती. येत्या सोमवारला सुनावणी होणार असल्याचे म्हटले जात होते; परंतु आता सुनावणी लांबणीवर गेल्याचे म्हटले जात आहे. आता सुनावणी ही १२ ऑगस्ट ला होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तारही  लांबणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहे.

मुख्यमंत्री शिंदे सरकारची  वैधता, विधानसभा अध्यक्षांची निवड व अन्य मुद्दय़ांवर शिवसेना(Shivsena) नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेले आहे. शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरविण्याची त्यांची मागणी आहे. तसेच, एकनाथ शिंदे यांनी विधानसभा उपाध्यक्षांची नोटीस रद्द करण्याची विनंतीदेखील केली आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी व न्यायमूर्ती हिमा कोहली या त्रिसदस्यीय पीठापुढे याप्रकरणी प्राथमिक सुनावणी पूर्ण झाली होती. या याचिका पाच किंवा अधिक सदस्यांच्या घटनापीठाकडे पाठवायच्या की नाही, यासोबतच काही मुद्दय़ांवर सोमवारी निर्णय दिला जाईल, असे न्यायालयाने पहिल्या सुनावणीमध्ये सांगितले होते; परंतु आता न्यायालयाच्या पुढील आठवडय़ासाठी निश्चित झालेल्या कार्यसूचीत या याचिकांवरील सुनावणी १२ ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली, त्यामुळे आता सोमवारी सुनावणी होणार नाही असे स्पष्ट झाले आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे