आपल खान्देशमहाराष्ट्र

पाचोरा तालुक्यातील सुतगिरणीसाठी ४० कोटी रुपये मंजूर- आमदार किशोर पाटील


झूम मराठी वृत्त

पाचोरा तालुक्यात गेल्या २ वर्षांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात मंजूर झालेल्या पाचोरा तालुक्यातील सुतगीरणीसाठी पहिला हप्ता ४० कोटी रुपये विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात मंजूर करण्यात आला अशी माहिती आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.

पाचोरा तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी २० एकर जागा घेऊन सुतगिरणीचे काम सुरू केले जाणार असून यासाठी शेतकरी सभासदांची अडीच कोटी रुपये वर्गणी जमा झालेली आहे.” भडगाव तालुक्यासाठी स्वतंत्र अशी सूतगिरणी उभारण्यासाठी मुख्यमंत्री यांनी हिरवा कंदील दिल्याने प्रस्ताव दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी त्यांच्या चिंतामणी कॉलनीतील ‘शिवालय’ या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, भडगाव येथील जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, शहरप्रमुख किशोर बारावकर, प्रवीण ब्राह्मणे, अनिल पाटील, स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील, राहुल पाटील, नाना वाघ उपस्थित होते.

आज झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार किशोर पाटील यांनी विकास कामांबद्दल माहिती देतांना सांगितले की, “पाचोरा शहरात जवळपास १३० खुले भूखंड असून त्यापैकी जवळपास २० कोटी रुपये सुरवातीस व त्यानंतर १० कोटी मंजूर करून या कामांची निविदा काढण्यात आलेली आहे. राज्यातील पाचोरा नगरपालिका ही एकमेव अशी नगरपालिका ठरत आहे की, ज्या पालिकेत सम्पूर्ण भूखंडाचा विकास करून त्या ठिकाणी वाॅल कंपाउंड व पेव्हर ब्लॉक बसवून वृद्धांसाठी मॉर्निंग वॉक, बसण्यासाठी आसने, लहान मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पाचोऱ्यात नव्याने महाराणा प्रताप चौक ते उड्डाणपूलपर्यंत सर्व्हिस रोडवर जॉगिंग ट्रॅक व ऑक्सिजन पार्क करून ऑक्सिजन देणारे १०० वृक्षांची लागवड करून ठिक ठिकाणी आसन व्यवस्था व शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची योजना हाती घेतली असून या योजनेसाठी ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.

भडगाव रोडवरील नवकार प्लाझा जवळ ३० टक्के जागा शिल्लक असून त्याठिकाणी ५.५० कोटीचे व्यापारी भवन व त्याला लागूनच पत्रकार भवन बांधण्याची योजना हाती घेण्यात आली आहे.”

याशिवाय भाजीपाला मार्केट जवळील जुन्या शॉपिंग कॉम्प्लेक्सचा राहिलेला भाग डेव्हलप करून त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते पूर्वीकडील भागाच्या दरगेपर्यंत शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधून भडगाव रोडवरील नवकार प्लाझा जवळ ३० टक्के जागा शिल्लक असून त्याठिकाणी ५.५० कोटीचे व्यापारी भवन व त्याला लागूनच पत्रकार भवन बांधण्याची योजना हाती घेण्यात आली आहे.” पाचोरा तालुक्याप्रमाणे भडगाव तालुक्यातील २५ : १५ योजनेसाठी ५ कोटी ५० लाख रुपये व भडगाव शहरातील १०० खुल्या भूखंडांपैकी ७० भूखंड डेव्हलप करण्यात आले असून उर्वरित भूखंड नगरपालिका निवडणुकीच्या आत पूर्ण केले जाणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे