डॉ स्वप्निल पाटील यांनी शर्थीचे प्रयत्न करून, तरुणांस मृत्यूच्या दाढेतून आणले परत ..
डॉक्टरांच्या तत्परतेमुळे उपचार मिळाल्याने रुग्णाचे प्राण वाचले असून, डॉक्टरांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने त्यांचे कौतुक होत आहे.
पाचोरा (अनिल आबा येवले) पाचोरा तालुक्यातील वाडी येथे दिनांक 23 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास युवक सोहेल शेख याला गाढ झोपेत अती विषारी जातीच्या मण्यार ह्या सर्पाचा चावा झाला होता. त्यानंतर त्याला गंभीर अवस्थेत पाचोरा येथे सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलला दाखल करण्यात आले. हॉस्पिटलचे डॉ स्वप्निल पाटील यांनी त्याला तपासले केले.
पाचोरा येथील सिद्धिविनायक रुग्णालय डॉ स्वप्निल पाटील व टीमच्या तत्परतेमुळे उपचार मिळाल्याने तरुण रुग्णाचे प्राण वाचले असून, दाखवलेल्या प्रसंगावधानाने त्यांचे कौतुक होत आहे
सदर तरुण हा बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे वं त्यास श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्याला व्हेंटिलेटर लावण्यात आले आणि सर्पदंशाची ट्रीटमेंट सुरु करण्यात आली. डॉ स्वप्निल पाटील दादा आणि त्यांच्या हॉस्पिटल टीम ने आपल्या ट्रीटमेंट आणि अनुभवाच्या जोरावर सोहेल ला मृत्यूच्या दाढेतून परत आणले. 5 दिवस हा तरुण व्हेंटिलेटर वर होता व दरम्यान 2 वेळा हृदय बंद पडल्यामुळे त्याला CPR देण्यात आला. काल त्या तरुणाला सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मधून सुट्टी देण्यात आली. त्यावेळेस सोहेल च्या कुटुंबियांनी डॉ स्वप्निल पाटील दादा व त्यांच्या हॉस्पिटल स्टाफ ने सोहेल ला योग्य उपचार करून नवीन जीवनदान दिल्याबद्दल सत्कार करून आभार मानले. यावेळेस सिद्धिविनायक हॉस्पिटल च्या बालरोगतज्ञ डॉ ग्रिष्मा पाटील, बनोटी येथील डॉ अजित पाटील व रहीम बागवान यांची उपस्थिती होती.



