आपल खान्देशब्रेकिंग

अनधिकृत बॅनर फ्लेक्स विरोधात सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र महाजन मैदानात..

बॅनर लावणाऱ्यांविरुद्ध पोलिसात फिर्याद देणार असल्याचा ईशारा दिला..

गावा गावातसध्या डिजिटल फ्लेक्स बॅनर बिनधास्त लावण्यात येतात त्याने गाव महानगरे, शहर विद्रुप तर होतेच मात्र ते असुरक्षित लावले जात असल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला असून त्याविरोधात धरणगाव जागृत मंचचे पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र महाजन यांनी अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांविरुद्ध पोलिसात फिर्याद देणार असल्याचा ईशारा दिला आहे.

जितेंद्र महाजन यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सर्व राजकीय सामाजिक कार्यकर्ते सगळ्यांना विनंती आहे की, शहरात अनधिकृत बॅनर कोणीही लावू नये. लावल्यास मी स्वतः संबंधित व्यक्तीविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करेल. तसेच जे बॅनर बनवणारे आहेत त्यांच्याविरुद्ध सुद्धा ही फिर्याद राहील. बॅनरमुळे कोणालाही इजा होणार नाही, याची काळजी बॅनर लावणाऱ्यांनी घ्यावी. नियमानुसार बॅनर लावल्यानंतर देखील त्यामुळे कोणाला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. बॅनर बनविणाऱ्यांना सुद्धा सूचना आणि बॅनर बनवताना नियमानुसार काळजी घ्यावी. अन्यथा बॅनर बनविणाऱ्यांवर सुद्धा कार्यवाही होत असते. सदर कार्यवाही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टच्या निर्णयानुसार असेल, त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी. बॅनर बनवणाऱ्यांनी सुद्धा अन्यथा, त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल होतील.परवानगी घेतली याचा अर्थ असा नाही ? की आपण कुठेही बॅनर लावू शकतो रस्त्यावर कुणालाही अडचण होणार नाही, अशा पद्धतीने बॅनर लावण्यात यावेत कोणालाही अडथळा होणार नाही याची दक्षता बॅनर लावणार यांनी घ्यावी अन्यथा ते सुद्धा बेकायदेशीर राहील ही काळजी बॅनर लावणार यांनी घ्यावी, अन्यथा सर्वांविरुद्ध कायदेशीर तक्रार दिली जाईल, असेही महाजन यांनी म्हटले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे