आपल खान्देश

पिंपळगावतील विकासकामांचे निमित्त दाखवुन गिरणा नदीतील अवैध रेती उतखनना विरोधात निवेदन.

झूम मराठी

भडगाव (प्रतिनिधी) भडगाव तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक (थडीचे) येथील सरपंच यांचे पति यांनी गावातील विकासकामांचे निमित्त दाखवुन अवैध वाळू वाहतूक सुरूच ठेवली असून त्यासंदर्भात तालुका प्रशासनास तहसीलदार कार्यालय भडगाव यांना गावकऱ्यांच्यावतीने निवेदन देण्यात आले.

पिंपळगाव थडीचे येथील सरपंच यांचे पती जयराम पाटील हे स्वतः ग्रामपंचायतीचे काम करीत असून त्यासाठी लागणारे वाळू प्रमाणापेक्षा जास्त उपसा उचल करीत आहेत तरी त्या संदर्भात काही गावकरी व गावातील सुज्ञ नागरिक वाळू उचलण्याच्या संदर्भात बोलायला गेले असता त्यांना अरेरावी करीत धमकी देत अंगावर मारण्यासाठी चालून गेले, एवढी मजल यांची कशी झाली कोणाचा आश्रयाखाली हे सर्व चालू आहे याचा जाब विचारून तालुका प्रशासनाला निवेदन देण्यात आलेले आहे जयराम पाटील हे गावाच्या विकास काम सांगतात आणि दिवसाढवळ्या नदीपात्रातून शासनाच्या कुठल्याही परवानगीशिवाय वाळू उपसा करीत असून एक ट्रॉली विकास काम चालत असलेल्या ठिकाणी व चार ट्रॉली बाहेर कुठेतरी विकत आहेत असे स्थानिक नागरिकांनी रोष व्यक्त करत निवेदन दिले

विकास काम दिनांक १९ २०२२ या दिवशी सरपंच यांचे पती जयराम बाबूलाल पाटील हे नदीपात्रात वाळू उचल व उपसा करण्यासाठी गेले असता गावातील काही सुज्ञ नागरिक व गावकरी व पर्यावरण प्रेमी यांनी सांगितले की, वेळेवर पाऊस होत नाही पाण्याचा संचय व्हावा पाणी पातळी खोलवर जात असून अवैध वाळू उपसा करण्यात येत असून ते चुकीचे व निसर्गावर आघात करणारे आहे म्हणून येथून वाळू उपसा करू नये तसेच दिनांक १९ ६ २०२२ या तारखेचे परमिट असेल तर दुसऱ्या दिवशी दिनांक २० ६ २०२२ या दिवशी वाळू उपसा कसा करण्यात येतो याला कोणाचा आश्रय व आशीर्वाद आहे या संबंधित घटनेप्रकरणी निवेदन करते यांच्या जवळ चित्रीकरण केलेली असून तेथील गावाचे प्रथम सुज्ञ नागरिक यांचे पतिराज जयराम बाबूलाल पाटील यांचे वर्तन समजून येईल गावातील काही तरुणांवर ते धावून आलेत अश्लील भाषेत शिवीगाळ केली व जबाबदार प्रथम गावाचे नागरिक सरपंच किंवा कोणीही पदसिद्ध व्यक्ती असं कृत्य करत असेल तर त्याला शासनाच्या नवीन निर्णयानुसार व नियमानुसार पदावरून दूर करण्यात येते.यांना खरोखरच सत्तेचा अहंकार झालेला असून सर्वसामान्य सुज्ञ नागरिकांना व गावकऱ्यांना नेहमी धमक्या देणे नाहक त्रास देणे मारण्यास धजावणे असे प्रकार नेहमी गावात गावचे प्रथम नागरिक सरपंच यांचे पती जयराम बाबूलाल पाटील हे करीत आहेत म्हणून तालुका प्रशासनाला नम्र निवेदन करण्यात आलेले आहे संपूर्ण गावाचं लक्ष आता तालुका प्रशासन काय निर्णय घेते व काय कारवाई करते याकडे लक्ष लागलेले आहे. व या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांना भडगाव तहसीलदार कार्यालय तालुका प्रशासनाच्या वतीने कळविण्यात यावे भडगाव तालुका तहसीलदार तालुका प्रशासनाच्या कारवाईनंतरच पुढील दिशा ठरविण्यात येईल असे निवेदनकरते यांचे म्हणणे आहे निवेदन भडगाव तहसीलदार मुकेश हिवाळे साहेब यांना सादर करण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे