आपल खान्देश

शुभांगी ताई पाटील यांना “सक्षम महिला रत्न पुरस्कार”

शुभांगी ताई पाटील यांना “सक्षम महिला रत्न पुरस्कार” देतांना

धुळे(झूम मराठी) महाराष्ट्र टीचर्स व स्टुडंट्स असोसिएशन च्या राज्याध्यक्षा सौ शुभांगी ताई पाटील यांना टाइम्स मीडिया फौंडेशन च्या वतीने देण्यात येणारा मानाचा “सक्षम महिला रत्न पुरस्कार” जाहीर करण्यात आला होता.काल पुणे येथील पं जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन येथे एका दिमाखदार सोहळ्यात शुभांगी पाटील यांना सदर पुरस्कार आ उल्हास पवार व श्री मोहन जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

संस्थे तर्फे मानपत्र,सन्मान चिन्ह, पैठणी व शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अभिनेत्री मा निशा परुळेकर, माजी केंद्रीय मंत्री मा शिवानंद हुल्याळकर,किसान सेल च्या सविता जामणिक,व्यवसाय मार्गदर्शिका मा दीपाली चांडक, जेष्ठ समाज सेविका तथा अंबिका मसाले च्या संचालक कमल बाई परदेशी, पोलीस उपायुक्त पुणे श्री कृष्ण प्रकाश, सौ सुनीता राजे पवार, तसेच सक्षम टाइम्स मीडिया फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मा विलास पाटील आदी मंचावर उपस्थित होते.

राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या 51 कर्तृत्ववान स्त्रीयांना हा पुरस्कार देण्यात आला असुन शिक्षण क्षेत्रात करत असलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल मा शुभांगी ताई पाटील यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यातुन हा पुरस्कार मिळवणाऱ्या शुभांगी पाटील या एकमेव पुरस्कारार्थी आहेत. त्यांच्या या पुरस्काराबद्द्ल राज्याचे शिक्षण संचालक तसेच विविध विभागातील शिक्षक व पदवीधर आमदार तसेच सामाजिक व शैक्षणिक व वकिली क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे