आरोग्य व शिक्षणगुन्हेगारीमहाराष्ट्र

प्राथमिक आरोग्य केंद्रातील ‘त्या’ महिला डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर जवळा येथील रहिवासी असलेल्या डॉ. तेजश्री पोपटराव ढवळे यांच्यावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ढवळे यांनी जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी पदावर काम करत असतानाही प्राथमिक आरोग्य केंद्र अळकुटी याठिकाणी देखिल समुदाय अधिकारी म्हणून काम करून 40 हजार रुपयांचे मानधन घेतले.

अखेर एकाचवेळी दोन जिल्ह्यांत सेवा करून मानधन घेतल्याप्रकरणी व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी ढवळे या महिला डॉक्टरविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, एकाचवेळी दोन ठिकाणी शासकीय नोकरी करून दोन्ही ठिकाणी मानधन घेऊन शासनाची फसवणूक केली आहे.

यासंबंधीची फिर्याद डॉ. संदीप साहेबराव देठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. ढवळे यांनी 3 जून 2021 ते 30 जून 2021 रोजी दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळवंडी व 1 जून 2021 रोजी ते 30 जून 2021 रोजी दरम्यान उपकेंद्र वडझिरे प्राथमिक आरोग्य केंद्र अळकुटी असे दोन ठिकाणी एकाच वेळी वैद्यकीय अधिकारी या पदावर शासकीय कर्तव्य बजावून शासनाकडून 40 हजार रुपये मानधन घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे