महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजणार; ‘या’ महिन्यात होणार मतदान..
राज्यात महापालिका निवडणुका वेळेत होतील कि नाही यावर गेल्या दिड महिन्यांपासून सुरु असलेल्या चर्चेला पुर्ण विराम मिळाला आहे.
झूम मराठी
राज्यातील महापालिका निवडणुक वेळेत होतील कि नाही यावर गेल्या चार ते पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या चर्चेला पुर्ण विराम मिळाला आहे. राज्य निवडणुक आयोगाने मुंबई महापालिकेचा आरक्षण विरहीत प्रारूप प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार राज्यातील महापालिकेचा आरक्षण विरहीत प्रारुप आराखडा जाहीर केला. त्याच तारखेपासून हरकती व सूचना मागविल्या जाणार असून त्यानुसार जून महिन्यात महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होतील अशी माहिती दिली. महापालिका निवडणुकांसाठीचा हा पहिला व महत्वाचा टप्पा असल्याने त्याअनुशंगाने निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे.
राज्यातील १८ महापालिकांची मुदत मार्च २०२२ मध्ये संपुष्टात आली आहे. कोरोना आणि आरक्षणाच्या गोंधळामुळे अद्याप पर्यंत निवडणुकीच्या प्रक्रियेला विलंब झाला आहे. नियमित वेळेत निवडणुक झाल्यास आता पर्यंत आचारसंहिता लागु होणे अपेक्षित होते परंतू तसे न झाल्याने अनेक इच्छुकांची घालमेल वाढली. सहा जानेवारीला प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा सादर करण्यात आला होता. ओबीसी आरक्षणाबाबत निर्णय होणार असल्याने प्रारूप प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यास विलंब होईल. त्यामुळे राज्य निवडणुक आयोगाने मुंबई महापालिकेचा प्रारूप प्रभाग रचनेचा जाहीर करण्याचे घोषित केले. निवडणूक प्रभागांच्या सीमा दर्शविणारी प्रारूप अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिध्द केली जाणार असून याच तारखेपासून हरकती व सूचना मागविल्या जातील.
म न पा निवडणूकचे वेळापत्रक जाहीर
- 15-4-2022 ला निवडणूक आचारसंहीता लांगणार
- 29-4-2022 ला वार्डरचना व वार्ड आरंक्षण ची सोडत
- 1-5-2022 ते 6-5-2022 आक्षेप दाखल करने 10-5-2022 ते 17-5-2022ला नामंकन दाखल करण्याची संधी
- 20-5-2022 ला नामंकन अर्ज छाननी
- 25-5-2022 ला नामंकन माघे घेन्याची शेवटची तारीख
- 5-6-2022 ला मतदान
- 10-6-2022 ला निकाल



