आपल खान्देशराजकीय

पाचोरा येथे शिवसेनेच्या दिपाली सय्यद यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची भाजपा महिला आघाडीची मागणी


झूम मराठी न्यूज नेटवर्क

पाचोरा(झूम मराठी) शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दि. २६ मे २०२२ रोजी व्हिडिओद्वारे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्याविषयी अर्वाच्च शब्दात वक्तव्य केले होते.

या वक्तव्यामुळे देशाच्या पंतप्रधानांच्या प्रतिमेची तसेच देशाची बदनामी होत असल्याने भारताचे नागरिक म्हणून आमच्या भावना दुखावल्या गेल्याचे यावेळी भाजपा महिला आघाडी पाचोरा पदाधिकाऱ्यांनी सांगितले, त्यामुळे शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी आपल्या देशाचे नेतृत्व करणाऱ्या पंतप्रधानां विषयी असे बदनामीकारक विधान करणे हा एक गंभीर स्वरूपाचा व दंडनीय गुन्हा आहे तरी दीपाली सय्यद यांनी केलेले वक्तव्य अतिशय गंभीर स्वरूपाचे असून त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर पद्धतीने गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन मा. प्रांताधिकारी पाचोरा व पोलीस निरीक्षक पाचोरा यांना पाचोरा भाजपा महिला आघाडीच्या वतीने देण्यात आले. याप्रसंगी भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष सौ साधना देशमुख शहराध्यक्ष ज्योती चौधरी,उषाताई पाटील, सुरेखा कोळी,कल्पना तडवी प्रिया कोळी,सखुबाई पाटील व आदी महिला पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे