सुनीता प्रदीप चौधरी यांची पाचोरा तालुका तैलीक महिला आघाडीच्या सचिव म्हणून नियुक्ती..
झूम मराठी न्यूज नेटवर्क
पाचोरा(झूम मराठी) पाचोरा येथील माजी नगरसेवक स्वर्गीय नारायण नामदेव चौधरी यांची दिव्यांग कन्या आणि तेली समाजाचे महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभा युवा आघाडीचे पाचोरा तालुका अध्यक्ष आणि स्वरसामर्थ्य संस्थेचे चेअरमन प्रदीप तुळशीराम चौधरी यांच्या अर्धांगिनी सौ सुनीता प्रदीप चौधरी यांची पाचोरा तालुका तैलीक महिला आघाडीच्या सचिव म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली.
महिन्यात काही दिवस आधी सौ सुनिताताई चौधरी यांना प्रहार दिव्यांग संस्थेचे पाचोरा तालुका महिला उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती मिळाली आहे. त्या दिव्यांग असूनही मागील 12 वर्षांपासून स्वताचा ब्युटी पार्लर व्यवसाय सांभाळून पतीच्या बरोबरीने वृद्ध सासू आणि 2 मुलींचे पालनपोषण देखील समर्थपणे करत आहेत. त्यामुळेच महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभेचे प्रदेशाध्यक्ष खासदार रामदासजी तडस, युवक आघाडी महाराष्ट्र सचिव नरेंद्र चौधरी, विभागीय उपाध्यक्ष तुषार चौधरी, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी सौ सुनीता चौधरी यांचे विशेष अभिनंदन केले आहे। त्यांच्या नियुक्ती बद्दल सौ सुनीता प्रदीप चौधरी यांचे त्यांचे चुलतभाऊ, माजी नगरसेवक प्रकाशजीभु चौधरी, तेली पंचमंडल पाचोरा तालुका अध्यक्ष मा. नायब तहसीलदार सतीश(भोला आप्पा),पाचोरा शहर अध्यक्ष नारायण दयाराम चौधरी,सचिव शांताराम चौधरी, ज्येष्ठ पत्रकार व तेली समाजसेवक सी एन चौधरी यांनी सौ सुनीतास भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.




