आपल खान्देश

पाचोर्‍यात संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधात मराठा क्रांती मोर्चा उपोषण..

 

  • पाचोरा -झूम मराठी ऑनलाईन

पाचोरा (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील मस्साजोग चे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्य आणि काही मागण्यांसाठी पाचोरा येथे अनोखे आंदोलन करण्यात आले यात मराठा क्रांती मोर्चा चे राज्य समन्वयक सचिन सोमवंशी यांनी स्वतः चा वाढदिवस साजरा नकरता या दिवशीत त्यांनी स्वर्गीय संतोष देशमुख यांना श्रद्धांजली म्हणून एक दिवशीय लाक्षणिक उपोषण केले या उपोषणाची सांगता प्रांत अधिकारी भूषण अहिरे यांनी सचिन सोमवंशी यांना लिंबू सरबत देऊन उपोषण सोडवले.

उपोषणाच्या वेळी शासनाकडे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने काही मागण्या करण्यात आल्या यात स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, निवृत्त न्यायाधीश यांच्या समितीमार्फत तपास करण्यात यावा, एसटीएस चे प्रमुख बसवराज तेली यांच्याकडे तपास ठेवावा, महाराष्ट्रातील निष्णात वकिलाला उभे करून मारेकरांना कठोर शिक्षा व्हावी म्हणून फास्टट्रॅक मध्ये सदरचा गुन्हा चालवण्यात यावा, स्वर्गीय देशमुख यांच्या परिवाराचे आर्थिक हानी झाली असल्यामुळे ती भरून निघू शकत नाही म्हणून शासनाने एक कोटी रुपयांपर्यंत आर्थिक मदत करावी, अशा मागण्या करण्यात आल्या होत्या प्रांताधिकारी भूषण अहिरे यांनी सदरच्या मागण्या शासनाकडे पाठवण्यात येईल असे आश्वासन दिले उपोषणाला वकील संघाचे माजी अध्यक्ष अँड अण्णासाहेब बोटे अध्यक्ष प्रवीण पाटील, सामाजिक कार्यकर्ते पी एस पाटील, अँड रणसिंग राजपुत, अँड . अनिल पाटील, अँड . अनुराग काटकर, अँड . राजेंद्र परदेशी, अँड पी बी पाटील, अँड सुनील पाटील, अँड स्वप्निल पाटील, श्रीमती गरुड, अँड मंगेश गायकवाड, अँड संदीप पाटील, माजी नगराध्यक्ष शांताराम सोनजी पाटील, शिवसेना उबाठा जिल्हा शेतकरी सेनेचे अध्यक्ष अरुण पाटील संतोष पाटील, माजी नगरसेवक खंडू सोनवणे, आरपीआय तालुका अध्यक्ष अण्णा खेडकर अल्बम निर्माते प्रवीण जाधव सरपंच संघटनेचे अध्यक्ष अक्षय जयस्वाल, प्रवीण पाटील सामाजिक कार्यकर्ते अण्णा बेलदार, कॉग्रेस जिल्हा सरचिटणीस राजेंद्र महाजन,इरफान मनियार, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, पत्रकार संरक्षण समिती जिल्हाध्यक्ष आत्माराम गायकवाड, वाईस मीडिया तालुकाध्यक्ष नंदू शेलकर कार्यअध्यक्ष राहुल महाजन पत्रकार शामकांत सराफ, दिलीप पाटील, दिलीप जय परदेशी, भुवनेश दुसाने, कुंदन बेलदार,, प्रवीण बोरसे, जावेद शेख, अँड राजेंद्र पाटील, ज्ञानेश्वर पाटील, अँड शांतीलाल सैंदाणे, गणेश पाटील, निलेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा वानखडे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे