आपल खान्देश

धनगर समाजास एस.टी अंमलबजावणी करण्यासाठी आमरण उपोषणास बसले असून, प्रशासनाने वेळीच दाखलघ्या असे निवेदन देण्यात आले..

धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) चे जात प्रमाणपत्र वितरित करण्याच्या आदेशाबाबत शासननिर्णय काढण्याच्या अनुषंगाने व पंढरपूर, लातुर व नेवासा या ठिकाणी सुरू असलेल्या आमरण उपोषणातील मागण्या मंजूर कराव्यात यासाठी आज पाचोरा तालुक्यातील धनगर बांधवाच्यावतीने निवेदन देण्यात आले 

धनगर समाजाला विना विलंब एस.टी.आरक्षण अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी धनगर समाजातील 6 मल्हार योंध्ये पांडुरंगाच्या पंढरीत गेल्या 15 दिवसांपासून आमरण उपोषणास बसले आहेत, मात्र शासन आणि प्रशासनाकडून अद्याप अपेक्षित कार्यवाही न झाल्याने राज्यातील सकल धनगर समाज बांधवांनी आज राज्यभर रास्ता रोको आंदोलन, निवेदन,उपोषण ई.प्रकारे ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येऊन शासनाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी पाचोरा शहर आणि तालुक्यातील सकल धनगर समाजातील पदाधिकाऱ्यांनी पाचोरा येथील उपविभागीय (प्रांत) अधिकारी सो,यांना निवेदन सादर करण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे