पाचोरा पोलीस खात्यातील अंमलदार राहुल साहेबराव बेहरे यांच्या वाढदिवस निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन!
अंमलदार राहुल साहेबराव बेहरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा रक्तदान शिबिराचे आयोजन! शिवभोजन थाळीचे मोफत वाटप..
झूम मराठी न्यूज नेटवर्क
पाचोरा (झूम मराठी) पाचोरा पोलिस स्टेशनचे अंमलदार राहुल साहेबराव बेहरे यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
पाचोरा पोलीस स्टेशनचे अंमलदार राहुल बेहरे यांच्या वाढदिवसानिमित्त व रेड ब्लड बँक जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न झाले.यात 122 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच वाढदिवसानिमित्त गोरगरीब जनतेस मोफत शिवभोजन थाळीचे ही वाटप राहुल बेहरे यांच्या हस्ते करण्यात आले.


राहुल बेहरे हे व्यक्तिमत्व सर्वांना परिचित असलेले व मनमिळावू स्वभावाचे असल्याने त्यांच्या वाढदिवसाला भरपूर प्रमाणात लोकांनी उत्साह दाखविला व त्यांना शुभेच्छा दिल्या.
पोलीस कॉन्स्टेबल राहुल बेहरे हे २४ तास सदैव कर्तव्यास बांधील असतात पोलीस दलात कार्यरत असताना सुद्धा आपल्या कर्तव्याचे पालन करून सोबतच अविरत सामाजिक बांधिलकी जोपासत ज्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली असे पाचोरा शहरात व तालुक्यात राहुल भैय्या यांचे नाव लौकिक झालेले आहे.
वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराला उपस्थित असलेले माजी आमदार दिलीप वाघ मा.नगराध्यक्ष संजय गोहिल शिवसेना युवा नेते सुमित पाटील शिवसेनेचे शहरप्रमुख किशोर बारावकर भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, मा.नगरसेवक वासुदेव महाजन मा.नगरसेवक बशीर बागवान,जि.प.सदस्य पदमबापु पाटील,आरपीआय तालुकाध्यक्ष विनोद आहिरे, पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील पोलीस उपनिरीक्षक गणेश चौबे, पो. कॉ. विनोद बेलदार, सुनील पाटील, भगवान बडगुजर, शामकांत पाटील, सचिन पवार, सर्व पत्रकार बांधव व सर्व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.



