आपल खान्देशगुन्हेगारी

भडगाव तालुक्यातील शेतकऱ्याची केळी व्यापारीने केली फसवणूक, गुन्हा दाखल!

झूम मराठी न्यूज नेटवर्क

भडगाव (झूम मराठी) शेतकरीच्या केळीच्या मालाचे १ लाख ७४ हजार रूपये न देता फसवणूक केल्याचा भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकावर करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, “राजेंद्र भिकनसिंग पाटील (वय-५७) रा. वडगाव मुलाने, ता. पाचोरा हे शेतकरी असून शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांनी केळी व्यापारी जाफर शेख बागवान रा. कजगाव ता. भडगाव यांना ३१ ऑक्टोबर २०२० पासून ते १२ डिसेंबर २०२० दरम्यान वेळोवेळी केळी पिकाचे माल विकला होता. शेतकरी राजेंद्र पाटील यांचे १ लाख ७४ हजार ७०२ रूपये अद्यापपर्यंत व्यापारी जाफर शेख यांनी दिले नाही. वारंवार संपर्क करूनही व्यापाऱ्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. अखेर शेतकरी राजेंद्र पाटील यांनी भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून व्यापारी जाफर शेख याच्या विरोधात भडगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि चंद्रसेन पालकर करीत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे