ब्रेकिंग

उत्पन्न हाती न आलेल्या शेतकर्याची जरंडीला गळफास घेवून आत्महत्या…जरंडीत खळबळ

उत्पन्न हाती न आलेल्या शेतकर्याची जरंडीला गळफास घेवून आत्महत्या…जरंडीत खळबळ

   सोयगाव,(प्रतिनिधी)अतिवृष्टीत हताश झालेल्या ४८ वर्षीय शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेतून गळफास घेवून जीवन संपविल्याची घटना जरंडी(ता.सोयगाव)येथे शनिवारी मध्यरात्री घडली.या घटनेमुळे जरंडीत शोककळा पसरली आहे.या प्रकरणी सोयगाव पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे.दुपारी उशिरा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शांताराम राजाराम मोरे(वय ४८) असे गळफास घेतलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.त्याची जरंडी शिवारात चार एकर शेती आहे.परंतु अतिवृष्टीमुळे कपाशीचे उत्पन्नच न आल्याने आणि बोंडअळींचा प्रादुर्भाव आढळून आल्याने शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे .चार एकर क्षेत्रात केवळ एक क्विंटल कपाशीचे उत्पन्न हाती आले त्यामुळे कर्जाचा डोंगर कसा दूर करावा या विवंचनेतून या शेतकऱ्याने एका झाडाला गळफास घेवून आत्महत्य केली आहे.शनिवारी मध्यरात्री घराजवळील लागून असलेल्या एका झाडाला त्यांनी गळफास घेवून आत्महत्या केली.कपाशीचे तुटपुंजे उत्पन्न आणि त्यातच बोंडअळींचा प्रादुर्भाव या विवंचनेतून कर्ज फेडण्याच्या विचारातून त्याने आत्महत्या केली आहे.या घटनेमुळे जरंडीत खळबळ उडाली असून महिनाभरात जरंडीला तिसऱ्या शेतकर्याची आत्महत्या झाली असल्याने प्रशासनाकडून मात्र शेतकऱ्यांसाठी कोणतेही ठोस निर्णय घेतल्या जात नसल्याचा अभाव असल्याचे आढळून येत आहे.

उत्पन्नच न आल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवून कर्जाचा डोंगर दूर करण्याच्या विवंचनेत हा शेतकरी होता.केवळ क्विंटलभर कपाशीचे उत्पन्न हाती आले असून अतिवृष्टीची तुटपुंजी रक्कमही पुरेनासी झाली होती.या त्रासाने वैतागून या त्रस्त शेतकऱ्याने टोकाची भूमिका घेतली आहे,या प्रकरणी सोयगाव पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे.सोयगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून दुपारी त्याचे वर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात आई,पत्नी,दोन मुले,एक मुलगी,दोन भाऊ असा परिवार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे