आपल खान्देश

लोण खुर्द येथील सरपंचा सह दोन सदस्य अपात्र!

शासकीय जमिनीवरील अतिक्रमण केल्याचे प्रकरण भोवले...


झूम मराठी वृत्त

जळगाव (प्रतिनिधि)लोण खुर्द ता अमळनेर येथील ग्राम पंचायतीचे सरपंच श्री विकास अरविन्द पाटील, सदस्य श्री बापू हिलाल पाटील व सदस्या सौ साधना बापुराव पाटील यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्या मुळे त्याना सरपंच व सदस्य पदावरुन अपात्र ठरविण्यात यावे.म्हणून श्री सुका वना भील व इतर तीन ग्रामस्थानी तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यावर चौकशी होऊन सरपंच,व दोन सदस्य.यांनी बेकायदा अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्यामुळे,जिल्हाधकारी श्री अभिजित राऊत यांनी सरपंच, व सदस्य पदावरुन दिनांक 13/5/2022. रोजी अपात्र घोषित केले आहे.

या बाबत सर्विस्तर वॄत असे की सरपंच श्री विकास अरविन्द पाटील, सदस्य श्री बापू हिलाल पाटील व सदस्या सौ साधना बापूराव पाटील. (पती- पत्नी) यांनी शासकीय जमिनीवर विना परवानगी अनधिकृत पणे अतिक्रमण करून त्यावर पत्री शेडचे बाधकाम केलेले आहे व अतिक्रमित जागेचा लाभ घेत असल्यामुळे त्यांना सरपंच व सदस्य पदावरुन अपात्र ठरविण्यात यावे. म्हणून श्रीसुका वना भील,श्री समाधान गुलाबराव शिंदे,श्री हंसराज श्रीकृष्ण पाटील, श्री देवचंद सहादू भील यांनी ग्रा. प. अधिनियम 1958 चे कलम 14.जे- 3 प्रमाणे जिल्हाधिकारी यांचे कडे विवाद अर्ज क्र-58/021. ने तक्रार दाखल केली असता, त्यावर सखोल चौकशी होऊन सरपंच व इतर यांनी शासकीय जमिनीवर शासनाची कायदेशीर परवानगी न घेता बेकायदेशिर व अनधिकृत पणे भोगवटा सदरी नावे लावुन घेतले आहे व सदर जागा मिळकती ताब्यात ठेवून लाभ घेत आहेत व पदाचा दुरूपयोग केला असल्याचे सिद्ध झाल्यामुळे विकास पाटील ,बापू पाटील व साधना पाटील यांना ग्रा. प. सरपंच, व सदस्य पदावरुन जिल्हाधिकारी श्री राऊत यांनी अपात्र ठरविले आहे. आम्ही स्वत: हुन अतिक्रमण केलेले नाही, अवैध फेरफार व रेकार्डवर खडाखोड करून अतिक्रमण धारक दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. हा सामनेवाले यांचा बचाव देखील फेटाळण्यात आला आहे. या निकाला मुळे ग्रामस्थांन म्हधे समाधानाचे वातावरण तयार झाले आहे.व अतिक्रमण धारकांना मोठी चपराक बसली आहे. तक्ररदार श्री सुका वना भिल, व इतरराचे वतीने अँड.विश्वासराव भोसले.(पिपरखेडकर) यांनी काम पाहिले. या निकाला कडे परीसराचे व तालुक्याचे लक्ष्य लागुण होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे