आपल खान्देश

भडगाव – रेल्वेचे खोटे नियुक्ती पत्र देऊन, बेरोजगारांची लाखो रुपयांची फसवणुक!

मुंबई रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाचे बनावट ऑफर लेटर व जॉइनिंग लेटर देऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला..

झूम मराठी न्यूज नेटवर्क

भडगाव (झूम मराठी) रेल्वेत नोकऱ्या मिळवून देण्याचे आमिष दाखवून शेकडो लोकांची फसवणुक केली जाते. कधी परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या हमीच्या नावाखाली तर कधी लाच देऊन नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली तरुणांची लुटले जाते. अशीच भडगाव तालुक्यातील भामट्याने रेल्वेचे खोटे नियुक्ती पत्र देऊन, बेरोजगारांची लाखो रुपयांची फसवणुक केल्याचा प्रकार आढळून आलाय.

अश्या भुलथापाना बळी पडू नका! हे भुरटे मासे गळाला लावतात तुम्हाला अमिष देतील पण तुम्ही बळीचा बकरा बनू नका…

 

रेल्वेत नोकरी लावण्याचे अमिष दाखवून लाखो रुपयांची संगमत करून फसवणूक करणारे उज्चल कॉलनी भडगाव जि. जळगाव येथील श्री प्रकाश श्रावण मालचे (सेवा निवृत्त शिक्षक), विशाल प्रकाश मालचे, सागर प्रकाश मालचे व त्याचा मित्र किशोरसिंग गणेशसिंग ठाकुर रा. प्लॉट नं. १६०२ इ. विंगनगर, शिपोली बस स्टॉप, पॅरासिड हायेस्ट, चिकुवाडी ओरोवली, वेस्ट मुंबई या चौघांनी विद्यानगर भडगाव जि. जळगाव येथील श्री. फकिरा सिताराम पाटील यांची व इतर सुशिक्षीत बेरोजगार लोकांची लाखो रूपयात फसवणुक झाल्याचे प्रकरण न्यायालयासमोर आलेले आहे.वरील फसवणुक करणारे यांनी फकिरा सिताराम पाटील यांना विश्वासात घेऊन त्यांचा मुलगा  दिपककुमार फकिरा पाटील याला आम्ही रेल्वेत गृप (C) सी. मध्ये नोकरीला लावू शकतो. आमचे नातेवाईक रेल्वे बोर्डात अधिकारी व मंत्री आहेत. ते त्यांच्या GM कोठयात त्यांच्या अधिकारात मुलांना नोकरी लावतात. असे सांगुन त्याच्या मुलाला रेल्वे गृप (C) सी चौ जॉइनिंग ऑर्डर देवून १५ लाखाची मागणी केली. ऑर्डर मिळल्यावर फकिरा सिताराम पाटील यांनी रोख रक्कम, चेक द्वारे, फोन पे द्वारे एकुण १५ लाख रूपये दिले. परंतु मध्येच कोरोना लॉकडाऊन लागल्यामुळे काही काळ वरील लोकांनी बनवाबनवीची उत्तरे दिली.

नंतर विशाल प्रकाश मालचे याने दिपककुमार फकिरा पाटील व अमोल मुरलीधर पाटील या दोघांना दिली येथे नेवून त्याची खोटी मेडिकल टेस्ट केली व दोघांना रेल्वे प्लॅटफॉर्मवर साफ-सफाई करवयास लावली आणि सांगितले की तुम्ही दोघे रेल्वेत नोकरीला जॉईन झाले असे सांगुन तुमचे जॉइनिंग ऑर्डर पोस्टाने येईल व तुम्हाला कामावर हजर करतील परंतू बरेच दिवस गेले तरी बेरोजगारांना ऑर्डर मिळाली नाही व हजरही केले नाही. सदर बाब हो श्री फकिरा सिताराम पाटील यांच्या लक्षात आले की आपली फसवणुक झाली तसेच चि. अमोल मुरलीधर पाटील रा. चोपडा जि. जळगाव, दिनेश मधुकर पाटील रा. वासरे ता. अमळनेर जि. जळगाव, जगदीश रोहिदास पाटील रा उंटावद ता. यावल जि. जळगाव यांना ही नकली खोटे जॉइनिंग लेटर देवून लाखो रूपयात फसवणुक केली आहे. नकली खोटे बनावटीचे रेल्वेची दिलेली जॉइनिंग ऑर्डर फर्यादी श्री. फकिरा सिताराम पाटील यांनी अॅडव्होकेट संजिदा हारूण शेख यांच्या मार्फत मे फौजदारी न्यायालय भडगाव जि. जळगाव येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असुन न्यायालयात IPC कलम ४२०४१९४६५४६६, ४६८, ४७१ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. सदर केस अॅडव्होकेट संजिदा एच. शेख चालवत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे