आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

पाचोऱ्यात एम एम महाविद्यालयात खुल्या व्यायाम शाळेचे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..

  • दिलीप जय परदेशी

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या एम एम महाविद्यालयात क्रीडांगणावर जय किरण प्रभाजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पाचोरा द्वारा म.सा जय किरण प्रभाजी यांच्या जयंती निमित्ताने स्वर्गीय ॲड.सुभाषचंद संघवी खुल्या व्यायाम शाळेचे आमदार किशोर पाटील व माजी आमदार दिलीप वाघ यांच्या हस्ते लोकार्पण मोठया उत्साहात संपन्न झाले.

पाचोरा शहरातील भडगाव रोड वरील एस एस एम एम महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर जय किरण प्रभाजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पाचोरा द्वारा म.सा जय किरण प्रभाजी यांच्या जयंती निमित्ताने स्वर्गीय ॲड.सुभाषचंद संघवी खुल्या व्यायाम शाळेचे उद्घाटन व लोकार्पण झाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार भाऊसाहेब दिलीप वाघ होते तर व्यायामशाळेचे उद्घाटन आमदार आप्पासाहेब किशोर पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी उद्घाटन पर मार्गदर्शन करताना आमदार किशोरआप्पा पाटील म्हणाले की एस एस एम एम महाविद्यालयाच्या या क्रीडांगणाचा मोह सर्वांनाच वाटतो हे क्रीडांगण सर्वांसाठी खुले असल्याने संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांचे त्यांनी आभार मानले या महाविद्यालयाने देश सेवेसाठी अनेक तरुण दिलेत याबरोबर जय किरण प्रभाजी या संस्थेच्या स्तुत्य अशा उपक्रमाची स्तुती करत संस्थेचे चेअरमन,संचालक मंडळाचे मा.आमदार साहेबांनी आभार मानले व शुभेच्छा दिल्यात.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातून उपस्थितांशी संवाद साधताना माजी आमदार दिलीप वाघ म्हणाले की आमची संस्था,महाविद्यालय हे सर्वांसाठी खुले आहे ही संस्था सुदृढ माणसांबरोबर सुदृढ मने घडविण्याचे काम करत आहे याबरोबरच जय किरण प्रभाजी नागरी पतसंस्थेच्या आर्थिक योगदानातून महिला व पुरुषांसाठी अंदाजे दहा लक्ष रुपयांच्या खुल्या व्यायामशाळा महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र उभार गेल्याने एका संस्थेने दुसऱ्या संस्थेला मदत केल्याने दोघांमधील स्नेह अधिक दृढ झाला आहे यामुळे त्यांनी जय किरण प्रभाजी पतसंस्थेच्या सर्व चेअरमन,व्हा. चेअरमन,संचालक मंडळाचे आभार मानले यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक जय किरण प्रभाजी पतसंस्थेचे चेअरमन अतुलभाऊ संघवी यांनी केले यावेळी संस्थेच्या माध्यमातून तरुणांना उच्च शिक्षणासाठी बिनव्याजी कर्ज देणे,मोफत मोतीबिंदू ऑपरेशन याबरोबरच वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत या सर्वांचा उल्लेख प्रास्ताविकातून केला.

या कार्यक्रमाच्या वेळी मा.नानासाहेब संजय वाघ चेअरमन पा.ता.सह.शिक्षण संस्था पाचोरा,माजी नगराध्यक्ष संजयभाऊ गोहिल माजी नगराध्यक्ष पंडिततात्या शिंदे मा.व्ही टी जोशी जय किरण प्रभजी नागरी पतसंस्थेचे संचालक दीपक सांगवी,हिम्मतराव भोईटे, शिवाजी आव्हाड अमित संघवी, सपनेश बाहेती मॅनेजर राजेश जैन याबरोबर पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे संचालक खालीलदादा देशमुख, योगेश पाटील, प्रकाश एकनाथ पाटील, डॉ.पी एन पाटील, वासुदेव महाजन, सतीश चौधरी, जगदीशबापू सोनार, प्रा.भागवत मालपुरे उपराचार्य, प्रा.डॉ.वासुदेव वले उपप्राचार्य, प्रा.जी.बी पाटील, प्रा.एस एस पाटील, प्रा.राजेश मांडोळे महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.माणिक पाटील यांनी केले तर आभार उपप्राचार्य प्रो डॉ वासुदेव वले यांनी मानले कार्यक्रमाला पाचोरा शहरातील जेष्ठ नागरिक महिला, पुरुष खेळाडू, विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे