आपल खान्देशब्रेकिंग

हवामान विभागाने दिलेल्या या गंभीर इशाऱ्यामुळे जळगाव जिल्हातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन..

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच आता हवामान विभागाने 28 सप्टेंबर रोजीही मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या विभागांना रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत

भारतीय हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यासाठी रेड अलर्ट’ जारी केला आहे. या काळात जिल्ह्यात वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पुढील काही तास महत्त्वाचे असून नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. जळगाव जिल्हासह नाशिक, छ. संभाजी नगर, धुळे, नंदुरबार, जिल्ह्यासाठी रेड अलर्ट’ जारी केला असूनपुढील चार तास हवामान विभागाकडून पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडू शकतो असा अंदाज आयएमडीकडून वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी, पुढील चार ते पाच तास खूपच महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहान देखील हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

जोरदार वाऱ्यांमुळे झाडे पडणे किंवा जुन्या, धोकादायक इमारतींचे भाग कोसळणे अशा दुर्घटनांची शक्यता असते. त्यामुळे नागरकांनी प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी. शक्य असल्यास प्रवास टाळावा.

तसेच नदी नाले काटाच्या कडेला राहणाऱ्या तसेच इतर नागरिकांनी देखील काळजी घ्यावी, आपल्या जनावरांना नदी नाल्या पासून दूर ठेवावे,  ज्या घरांमध्ये पाणी जाण्याची शक्यता असेल त्या घरातील नागरिकांना शाळा किंवा इतर सुरक्षित ठिकाणी तातडीने शिफ्ट करावे काहीही मदत हवी असेल तर तातडीने ग्राम प्रशासन आणि तालुका प्रशासन यांच्या निदर्शनास बाबी आणून द्याव्यात.

तसेच सर्व नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि पुढील काही तास दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे