आपल खान्देश

पाचोरा तालुक्यातील माहिती अधिकार कार्यकर्त्याची जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाकडून निर्दोष सुटका!

पाचोरा लाईव्ह सिटी रिपोर्टर 


पाचोरा (झूम मराठी) पाचोरा पंचायत समितीच्या काही भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात माहिती अधिकार कार्यकर्ते मुरलीधर परदेशी यांनी कागदपत्रे मिळवून वरिष्ठांकडे भ्रष्टाचाराच्या तक्रारी केल्या होत्या. संबंधित विभागांकडे आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यांना देखील तक्रारी केल्या होत्या. पाचोरा पंचायत समितीच्या भ्रष्ट कारभाराविरोधात ग्रामस्थासह ते उपोषणाला देखील बसले होते.

सविस्तर माहिती अशी की मौजे आखतवाडे गावातील घरकुल घोटाळा, रस्ते आणि गटारीच्या कामात घोटाळा, पाणी पुरवठा योजनांचा कामात घोटाळा, शौचालय घोटाळा हया सगळ्या विषयांची वारंवार पंचायत समितीकडे तक्रार करत होते. त्यामुळे वैतागून २५ एप्रिल २०१४ ला पंचायत समिती पाचोरा येथील सर्व कर्मचारी एकत्र येऊन यांनी मुरलीधर परदेशी यांच्यावर कलम ३५३ अंतर्गत खोटा गुन्हा दाखल केला होता. त्यांच्या विरोधात पंधरा कर्मचाऱ्यांनी खोटी साक्ष दिली होती. काल जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाने सर्व साक्षी पुरावे तपासून, दोन्ही पक्षांच्या वकिलांची बाजू ऐकून, माहिती अधिकार कायद्याच्या आधारे मिळवलेले भ्रष्टाचाराचे पेपर तपासून जिल्हा सत्र न्यायालयाने मुरलीधर परदेशी यांची काल २०/०४/२०२२ रोजी निर्दोष सुटका केली आहे.

सत्य हे कधीही लपत नसतं! फक्त समोर येयायला वेळ लागत असतो. हे वरील निकालावरून सिद्ध झाल आहे. मुरलीधर परदेशी यांच्या वतीने अँड शर्मा साहेब आणि अँड सचिन देशपांडे पाचोरा हयानीं बाजू मांडली आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे