गुन्हेगारी

अखेर `त्या` रंगेल हभप महाराजाला बेड्या..

औरंगाबाद, (झूम मराठी) : औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातल्या एका किर्तनकार महाराजाचा एका महिलेसोबतचा अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी वारकरी संप्रदाय संघटनेकडून संबंधित किर्तनकार महाराजावर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली होती. अखेर या रंगेल महाराजाला गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.

गंगापूर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने महाराजास जामीन मंजूर केला. गेली अनेक वर्षे औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यात प्रतिष्ठीत किर्तनकार म्हणून ओळख असलेल्या या महाराजाचा महिलेसोबतचा अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहून त्यांना मानणाऱ्या भक्तांमध्ये संताप व्यक्त होत होता. हे महाराज आणि व्हिडिओमध्ये दिसणारी महिला गेल्या अनेक दिवसांपासून कीर्तन करतात. त्यांचा मोठा भक्त परिवार आहे. दोघांचे युट्यूबवर लाखो फॉलोअर्सवर आहेत.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यांचा भक्तांना मोठा धक्का बसला असून संतापाची लाट उसळली. या किर्तनकार महाराजाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज सेनेचे ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज डोणगावकर यांनी व्हिडिओमध्ये असलेल्या किर्तनकार महाराज आणि महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली होती. याबाबत शिल्लेगाव पोलीस ठाण्यात त्यांनी रितसर तक्रार दिली होती. अखेर आज पोलिसांनी या महाराजाला ताब्यात घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे