महाराष्ट्रराजकीय

पक्षाने आदेश दिल्यास मी पंढरपूरमधून पोटनिवडणूक निश्चितपणे लढवीन – राम शिंदे

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी 17 एप्रिलला मतदान होणार असून 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

 

 डिजिटल झूम मराठी न्यूज मीडिया 

 

सोलापूर -राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी 17 एप्रिलला मतदान होणार असून 2 मे रोजी मतमोजणी होणार आहेया निवडणुकीसाठी 23 मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होणार असून 30 मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर 3 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.राष्ट्रवादीकडून दिवंगत आमदार भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके किंवा भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांच्यापैकी एकाला उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता आहे.

दरम्यान, आता भाजपकडून माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांना भाजप निवडणुकीत उतरवू शकते अशी शक्यता आहे.या विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाचं प्राबल्य आहे. त्यामुळे राम शिंदे यांना उमेदवारी देत भाजप जातीचं समीकरण जुळवण्याच्या आणि मतदारसंघात विजय मिळवण्याच्या विचारात असल्याचं बोललं जात आहे.

राम शिंदे यांच्या नावाला जिल्ह्यातील भाजपचे नेते माजी मंत्री सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांची अनुकूलता असल्याचं बोललं जात आहे. या संदर्भात आम्ही शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

शिंदे म्हणाले, काही कार्यकर्त्यांनी माझे नाव पुढे केले आहे हे खरे आहे. मी देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. पक्षाने संधी दिल्यास आणि निवडणूक लढवायला सांगितल्यास मी निश्चितपणे निवडणूक लढवीन. दोन्ही देशमुख आणि मोहिते-पाटील,परिचारक आणि त्याठिकाणी असणाऱ्या इतर नेत्यांनी देखील अनुकुलता दर्शविली आहे असं देखील ते म्हणाले.आता याबाबतचा निर्णय पक्षाने घ्यायचा आहे असं देखील ते म्हणाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे