महाराष्ट्रराजकीय

कोल्हापूरच्या पराभवानंतर चंद्रकांत पाटलांची प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडी?

मुंबई (झूम मराठी वृत्त) कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने भाजपला पराभूत केले. काँग्रेस आणि पर्यायानं महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी भाजप उमेदवार सत्यजित कदम यांचा जवळपास १८ हजार मतांनी पराभव केला. ही पोटनिवडणूक जरी जयश्री जाधव आणि सत्यजित कदम यांच्यात झाली असली तरी खरा सामना हा महाविकास आघाडीतील नेते सतेज पाटील, हसन मुश्रीफ आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  यांच्यात होता. मात्र, या निवडणुकीत आणि कोल्हापुरात चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर आता चंद्रकांत पाटील यांच्या भाजप प्रदेशाध्यक्षपाच्या राजीनाम्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानांचा मोठा फटका बसल्याची चर्चा सध्या भाजपच्या गोटात सुरू आहे. त्यामुळे पाटील यांना केलेली विधाने अंगलट येणार अशी चर्चा भाजप नेत्यांमध्ये  असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मूळचे कोल्हापूरचे असलेल्या चंद्रकांत पाटील यांना २०१९च्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात भाजपला एकही जागा मिळवून देता आली नाही. महापालिका निवडणुकीतही भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. गोकुळ दूध संघ निवडणुकीतही भाजपला मोठा फटका बसला. तर आता पार पडलेल्या पोडनिवडणुकीतही भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडी केली जाणार असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे