महाराष्ट्रराजकीय

नांदगाव आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी हातात बांधले शिवबंधन,

 आरपीआयचे नाशिक जिल्हा ग्रामीण सचिव कपिल तेलोरे यांच्या सोबत डझनभर आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, आमदार सुहास कांदे यांनी प्रवेश करतांना शिवबंधन बांधले.

नांदगाव प्रतिनिधी -( मुक्ताराम बागुल) – नांदगाव तालुक्यातील नांदगाव येथील शिवनेरी या शासकीय विश्रामगृहात आरपीआय आठवले गटाची नाशिक जिल्हा ग्रामीण सचिव कपिल भाऊ तेलुरे यांच्यासोबत आरपीआयच्या डझनभर पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांना नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी शिवबंधन धागे बांधले.

आरटीआय आठवले गटाची नाशिक जिल्हा ग्रामीण सचिव कपिल भाऊ तेलोरे हे सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर असून आरपीआयच्या माध्यमातून अनेक सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवत असतात. आमदार सुहास कांदे यांचे नांदगाव विधानसभा मतदारसंघातील धडाडीचे कार्य पाहता कपिल भाऊ तेलोरे शिवसेना पक्ष व आमदार सुहास गांधी यांच्या कार्य कडे आकर्षित होत अखेर कपिल तिलुरे यांच्यासोबत डझनभर पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.

पक्षप्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आमदार सुहास कांदे यांनी शिवसेना पक्षातर्फे स्वागत केले तसेच सर्वांना पश्चात योग्य मानसन्मान मिळेल असे आश्वासन यावेळी दिले.पैसे नाशिक जिल्हा ग्रामीण सचिव कपिल भाऊ तेलोरे यांच्यासह युवक शहराध्यक्ष आकाश थोरात, स्वाभिमानी रिपब्लिकन नांदगाव शहराध्यक्ष अविनाश पवार, अरे पैसे राधेशी धनगर आघाडीची भिका भाऊ खटके, तसेच मौजे रोहिले बुद्रुक येथील वंचित बहुजन आघाडी ची शाखाध्यक्ष कल्याण तातेराव बागुल, प्रहार शेतकरी संघटनेचे बाबासाहेब कचरू गायके, ग्रामपंचायत सदस्य सुरेश भास्कर बागुल, प्रल्हाद केशव बागुल, संतोष रमेश बागुल, तर रिपाईचे विनोद आहिरे, भावडू मोरे, सुनील बडोदे, शांताराम शिलावट, सुभाष चव्हाण, नाना भाऊ गरुड आदींनी शिवसेना पक्षा मध्ये आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

 या प्रवेश सोहळ्याप्रसंगी नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे, शिवसेना नांदगाव तालुका प्रमुख किरण भाऊ देवरे, नांदगाव नगरपालिका माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, नांदगाव पंचायत समितीचे माजी सभापती विलास आहेर, गुलाब भाबड, अमोल नावंदर, शिवसेना नांदगाव शहर प्रमुख सुनील जाधव, युवा सेना तालुका प्रमुख सागर हिरे, भैय्यासाहेब पगार, अयाज शेख, भाऊराव बागुल उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे