आपल खान्देशगुन्हेगारी
भडगाव – विवाहितेचा विनयभंग करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल
झूम मराठी
भडगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या ४० वर्षीय विवाहितेला मारहाण करून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भडगाव पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, भडगाव शहरातील एका भागात राहणारी ४० वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. आरोपीनी महिलेच्या घरात घुसून तिला लोखंडे सळईने हातावर बेदम मारहाण केली. त्यामुळे त्यांचा हाताची करंगळी फॅक्चर झाले आहे तर एकाने शिवीगाळ करून ‘तू बाहेर भेट तुला उडवून देऊ’, अशी धमकी दिली तर यातील एकाने महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी महिलेची महिलेने भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन संशयित आरोपीच्या विरोधात भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पांडुरंग सोनवणे करीत आहे.


