प्रामाणिकपणा ! पाचोरा वाहतूक पोलिसांचे हरवलेले पाकिट प्रामाणिकाच्या लागले हाती…
निलेश पाटील
झूम मराठी पाचोरा – छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वाहतूक पोलीस नंदकिशोर जगताप हे आपले कर्तव्य बजावत असतांना यांचे पाकीट गहाळ झाले असता पाकीट शोधायचे कसे या विंवचनेत असलेल्याने,सदर पाकीट शांताराम खैरे व विनोद अहिरे यांना सापडले व त्यांनी क्षणाचा विलंब न करता ते सापडलेले पाकीट पाचोरा पोलीस चौकीत प्रामाणिकपणे आणून दिले त्यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत होते.
सविस्तर वृत्त असे कि, पाचोऱ्यात सायं. सात वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ड्युटी करत असताना सिटी पोलीस नंदकिशोर जगताप यांचे पाकीट गहाळ झाले असता पाकीट शोधायचे कसे या विंवचनेत असलेल्याचे पाकीट शांताराम खैरे व विनोद अहिरे यांना सापडले व त्यांनी क्षणाचा विलंब करता ते प्रामाणिकपणे ते सापडलेले पाकीट पाचोरा पोलीस चौकीत आणून दिले. पी आय नजन पाटील यांनी पाकीट तपासून बघितले, पाकिटात सात हजार दोनशे रुपये होते आणि जगताप हवालदार यांचे पोलीस कार्ड एटीएम असे कागदपत्र होते ते पाकीट शांताराम खैरे व विनोद अहिरे यांनी आपला प्रामाणिकपणा दाखवून पी आय नजन पाटील त्यांच्याजवळ दिले त्यानंतर सिटी पोलीस नंदकिशोर जगताप यांना पीआय साहेबांनी फोन लावून बोलवुन घेतले! आणि सगळी विचारपुस झाल्यानंतर
पाचोरा शहर पी आय नजन पाटील व ए पी आय विकास पाटील यांनी शांताराम भाऊ व विनोद भाऊ यांनी जो प्रामाणिकपणा दाखवला त्याबद्दल यांचे आभार मानले.




