ब्रेकिंग

लग्न होऊन दहा वर्षांनी आईने दिला, तीन मुलांना दिला जन्म!

एकाच वेळी तीन मुलांना दिला जन्म, आईसह दोन मुली एक मुलगा यांची प्रकृती स्थिर.


झूम मराठी

नांदगाव प्रतिनिधी – (मुक्ताराम बागुल) – सुरगाणा तालुक्यातील सध्या नाशिक येथे स्थायिक असलेल्या एका महिलेने चक्क तीन बाळांना जन्म दिल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. एका मुलीने एकाच वेळी दोन बाळाला जन्म देणे ही बाब आता सर्वसामान्य झाली आहे. असे असले तरी मूळचे सुरगाणा तालुक्यातील व सध्या नाशिक येथे स्थायिक असलेल्या एका महिलेने तीन बाळांना जन्म दिला असून यामध्ये दोन मुली व एक मुलगा असा समावेश असून बाळासह त्यांच्या आईची प्रकृती स्थिर आहे.

सध्या नाशिक येथे रहिवासी असलेल्या 32 वर्षीय गायत्री गणेश महाले यांना प्रसूतीसाठी नाशिक येथील एका खाजगी रुग्णालयात दिनांक 16 मार्च 2012 रोजी दाखल करण्यात आली होते. त्याच दिवशी रात्री 09:52 मिनिटांनी त्यांची प्रसूती झाली. यावेळी गायत्री गणेश महाले या महिलेने एक नव्हे दोन नव्हे तर चक्क तीन बाळांना(मुलांना) जन्म दिला. या तीनही चिमुकल्यांच्या जन्मवेळेत अवघ्या एका मिनिटाची अंतर असून आई आणि तीनही बाबांची प्रकृती चांगली असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. या तीनही बाळांचे वजन अनुक्रमे दोन किलो असे आहे.

 या महिलेची प्रसूतीची ही पहिलीच वेळ असून तब्बल दहा वर्षांनी मुलं झाली. आईसह सर्व बाळ सुखरूप असल्याने या तीनही चिमुकल्यांच्या पावलांनी कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. गावातील आणि परिसरातील ही बहुधा पहिलीच घटना असल्याने सदर विषय चांगला चर्चिला जात आहे. 

तीन बाळा असल्याने सुरुवातीपासूनच गरोदरपणात महिलांची विशेष काळजी घेण्यात येत होती. मात्र तरी चिंता सतावत होती की बाळाची आणि आईची प्रकृती प्रसिद्धी पर्यंत चांगली राहावी. घरात एकाच वेळी तीन बाळांची आगमन झाल्याने आमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे त्यांचे आरोग्य सदर लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे अशी प्रतिक्रिया यांनी दिली आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे