पाचोऱ्यात शिवसेनेचा भाजपावर “बॅनर वॉर”…!
हा तुमचा विकास का..! खासदार साहेबांनी मतदारसंघात एक मुतारी देखील बांधलेली नाही विकास तर दुरच..
झूम मराठी
दिलीप जय परदेशी
पाचोऱ्यात शिवसेना आणि भाजप यांच्यात तालुक्यातील व शहरातील विकासावरून नेहमीच वाद होत असतात, त्यातच याच आठवडयात भाजपा ने शिवसेना व आघाडी सरकार विरोधात प्रचंड रॅली काढून ढोल बजाओ आंदोलन केले होते, त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी शिवसेनेने भाजप विरुद्ध प्रति रॅली काढून भाजपला थेट आव्हान केले होते.भडगाव पाचोऱ्यातील राजकारनातील होळी आधीच शिवसेना भाजपात धुळवळ खेळली गेली. शिवसेना-भाजप मध्ये संघर्ष शिगेला पोहोचलाय शिवसेना-भाजप नेत्याकडून -प्रत्यारोपांचे एकही संधी सुटत नाही येत नसल्याचे दिसून येत आहे
शिवसेनेने पाचोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज चौकात बॅनर लावून भाजपवर खरपूस समाचार घेत, भाजपच्या खासदार उन्मेष पाटील यांना थेट प्रश्नच केला आहॆ. या बॅनर वर उघड्यावर लघु शंका करतांना इसम व एकीकडे खासदार उन्मेष पाटील यांचा फोटो व दुसऱ्या बाजूस आमदार किशोर आप्पा पाटील यांनी मतदार संघात केलेली कामे.
हा तुमचा विकास का..! खासदार साहेबांनी मतदारसंघात एक मुतारी देखील बांधलेली नाही विकास तर दुरच.. खासदार साहेब मतदार संघात एक तरी मुतारी दाखवा गिरणेची परिक्रमा करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली तसेच गरिबांची पी. जे. रेल्वे गाडी बंद करण्यात आली.
अश्या स्वरूपात “बॅनर वॉर” चर्चेचा विषय झाला ठरत आहॆ. भाजप या बॅनरला काय उत्तर देते लोकांचे लक्ष लागून राहिले आहॆ.

निलेश पाटील




