आपल खान्देश
पाचोऱ्यातील छत्रपती दुग्धलायाचे समाधान पाटील यांचे आकस्मित निधन!
निधन वार्ता
पाचोरा : पाचोरा शहरातील भडगाव रोड वरील छत्रपती दुग्धलायाचे मालक समाधान आत्माराम पाटील (40 रा सामनेर) यांचे आज सकाळी अचानक निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या सामनेर या गावी संध्याकाळी 7 वाजता निघेल. त्यांच्या पश्चात आई वडील दोन भाऊ आणि पत्नी व मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
आज सकाळी बारा वाजता समाधान पाटील हे शेतातून जेवण करायला पाचोरा शहरातील शाहूनगर येथील घरी आले असता त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले त्यांना रुग्णवाहिकेने दवाखान्यात नेले असता त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच सामनेर व पाचोरा शहरात हळहळ व्यक्त होत आहॆ. समाधान पाटील हे मेहनती व मन मिळवू असल्याने अल्पवाधित त्यांनी सर्वांची मन जिंकली होती.




