ब्रेकिंग

उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे उल्हासनगर शहराचे काँग्रेस पक्षाचे नव नियुक्त प्रभारी महासचिव उमाकांत अग्निहोत्र व सह प्रभारी मनोज शिंदे यांचा पदग्रहण सोळाहा पार पडला.

उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे उल्हासनगर शहराचे काँग्रेस पक्षाचे नव नियुक्त प्रभारी महासचिव उमाकांत अग्निहोत्र व सह प्रभारी मनोज शिंदे यांचा पदग्रहण सोळाहा पार पडला.

शरण खन्ना
ठाणे जिल्हा प्रतिनिधी
दि १३ नोव्हेंबर :

सदर कार्यक्रमात शहर अध्यक्ष रोहित साळवे, ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम लुल्ला, काँग्रेस गटनेत्या अंजली साळवे, साफ सफाई कर्मचारी संघाचे प्रदेश अध्यक्ष राधाचारन करोतिया, कार्याध्यक्ष मोहन साधवानी, माजी महापौर मालती करोतिया उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व आघाडी व सेलचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना प्रभारी उमाकांत अग्निहोत्री यांनी शहरात पक्ष बळकट करण्यासाठी आणि येणाऱ्या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी एकत्रित काम करण्यास सांगितले तसेच महाराष्ट्र अध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात सुरु करण्यात आलेल्या महागाई विरोधात जन जागरण अभियानात सर्वांनी सक्रिय सहभागी होऊन लोकांना पक्षासोबत जोडण्याचे काम करण्याचे आवाहन केले.

सह प्रभारी मनोज शिंदे यांनी संघटन वाढवण्यासाठी पक्षाचे सर्व कार्यक्रम संपूर्ण ताकदीने राबवून जनतेपर्यंत काँग्रेसचे कार्य पोहचवण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले.
शहर अध्यक्ष श्री. रोहित साळवे यांनी नव नियुक्त प्रभारींच्या नेतृत्वाखाली पूर्ण जोमाने व मिळून पक्ष संघटन वाढवण्याचे आश्वासन देत आलेल्या मान्यवरांचे आभार मानले.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे