आपल खान्देश

नगरदेवळा-बाळद गटात आमदार पाटीलांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन

झूम मराठी वृत्त

पाचोरा (झूम,मराठी) तालुक्यातील नगरदेवळा गावसह जवळच असलेल्या आखतवाडे, नेरी, टाकळी, खाजोळा, पिंप्री, होळ, संगमेश्वर येथे आमदार निधी व जिल्हापरिषद मधून विविध विकासकामांचे भूमीपूजन व लोकार्पण आमदार किशोर पाटील व शिवसेना जिल्हापरिषद गटनेते रावसाहेब पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

नगरदेवळा गटात आमदार निधीतून व जिल्हा परिषदच्या माध्यमातून विविध विकासकामे सुरू असून त्यात नगरदेवळा, खाजोळा येथे प्रत्येकी 2 साठवण बंधारे बांधणे, नेरी, पिंप्री, होळ, टाकळी, संगमेश्वर येथे एक एक-एक साठवण बंधारा बांधणे, खाजोळा येथे गडद नदीवर पुलाचे बांधकाम करणे, निपाने मोहलाई पाईप मोरी डांबरी रस्ता करणे, टाकळी येथे रस्ता डांबरीकरण करणे, आखतवाडे मोहलाई रास्ता करणे, टाकळी येथे पूल बांधणे इत्यादी कामाचे भूमिपूजन करण्यात आले. खाजोळा, आखतवाडे येथे अंगणवाडी चे लोकार्पण, नगरदेवळा उर्दू शाळा खोल्यांचे लोकार्पण, टाकळीत दलित वस्ती मध्ये काँक्रीटीकरण चे लोकार्पण, तसेच घुसर्डी डांबरीकरण रस्ता लोकार्पण अश्या अंदाजित 12 कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन व उदघाटन पार पडले.

या प्रसंगी सभापती अंबादास सोमवंशी, शांताराम पाटील, रवीबाबा पाटील पिंप्री, विधासभा क्षेत्रप्रमुख अविनाश कुडे, धर्मराज पाटील, कृष्णा सोनार, वसंत पाटील, गोकुळ पाटील, महारू पवार, किरण पाटील, मनोहर ससाणे, भावडू राजपूत, प्रवीण गढरी, नूर बेग मिर्झा,भारत पाटील, विनोद पाटील, शांताराम कोष्टी, विजय चौधरी, गजेंद्र पाटील, नारायण पाटील, सांडू दादा, प्रकाश पाटील, रोशन पाटील, वाल्मिक पाटील, सागर पाटील, अनिल पाटील, दिपक पवार, भीमराव देवकर, भागवत पाटील, महेंद्र पाटील, रमेश पाटील, भैया महाजन, आनंद पाटील, सुरेश शेळके, ऍड. कैलास सोनवणे, रवींद्र पाटील, राजेश जाधव, धनराज चौधरी यांच्यासह परिसरातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे