आपल खान्देशकृषीवार्ता

जळगावात आज पासून कृषी प्रदर्शनाला सुरवात

कृषी प्रदर्शन सर्वांसाठी मोफत असून शेतकर्‍यांसाठी हे वरदान ठरणार असून या प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी भेट देणाऱ्या शेतकर्‍यांना निर्मल सीड्सतर्फे भाजीपाल्याच्या दहा ग्रॅम बियाणाचे पाकीट मोफत दिले

झूम मराठी

जळगाव : शहरातील शिवतीर्थ मैदानावर (जी. एस. ग्राऊंड) अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे आयोजीत चार दिवसीय कृषी प्रदर्शनाला दि .११ मार्च म्हणजे आज पासून सुरुवात होत आहे. हे कृषी प्रदर्शन सर्वांसाठी मोफत असून शेतकर्‍यांसाठी हे वरदान ठरणार असून या प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी भेट देणाऱ्या शेतकर्‍यांना निर्मल सीड्सतर्फे भाजीपाल्याच्या दहा ग्रॅम बियाणाचे पाकीट मोफत दिले जाणार आहे. या कृषी प्रदर्शनाचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अ‍ॅग्रोवर्ल्डचे संचालक शैलेंद्र चव्हाण यांच्याकडून करण्यात आले आहे.

जळगाव शहरात अ‍ॅग्रोवर्ल्डचे ११ ते १४ मार्च या चार दिवसांत होणार्‍या या कृषी प्रदर्शनात तब्बल ४ एकरवर २२० पेक्षा अधिक स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. कृषी क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या अनेक नावलौकिक कंपनींचे स्टॉल्स कृषी प्रदर्शनात भाग घेणार आहे. मजूर समस्या व बदलते हवामान ही शेतकऱ्यांना शेती करताना येणारी सर्वात महत्त्वाची समस्या आहे. या कृषी प्रदर्शनात मजूर समस्येवर पर्याय ठरेल, अशी पिके तसेच कमी श्रमात, कमी पाण्यात, हमी उत्पादन देणार्‍या अपारंपरिक पिकांचेही स्टॉल्स असणार आहेत. याशिवाय प्रत्यक्षात पिकांवर ड्रोनने कशी फवारणी करता येईल, हे शेतकर्‍यांना पाहता येणार आहे. हा खान्देशातील पहिलाच प्रयोग आहे. सोबतच दूध काढणी यंत्र, विविध आकारातील शेततळ्यांची माहिती तसेच त्रिस्तरीय मत्स्यपालन तसेच मोबाईलद्वारे शेतातील वीज पंप सुरु व बंद करण्याचे उपकरणही शेतकर्‍यांना पाहता येईल. 

प्रदर्शनस्थळी शेतीविषयक विविध पुस्तके देखील विक्रीसाठी उपलब्ध राहतील. यंत्र व अवजारांचे स्वतंत्र दालन, सर्व शासकीय विभाग, बँक, प्रोजेक्ट रिपोर्टसह अनुदानाबाबत एकाच छताखाली माहिती मिळेल. याशिवाय नावलौकिक ठिबक कंपनींसह बियाणे, खते, किटकनाशके तसेच इतर उत्पादकांचे स्टॉल्सही राहणार आहे. कृषी प्रदर्शनस्थळी भेट देणार्‍या शेतकर्‍यांची गोदावरी फाऊंडेशनतर्फे मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. जैन इरिगेशन सिस्टिम लिमीटेड या कृषी प्रदर्शनाचे प्रायोजक असून प्लॅन्टो कृषी तंत्र, श्रीराम ठिबक, र्‍हायनोमॅट, ओम गायत्री नर्सरी, निर्मल सीड्स, ग्रीन ड्रॉप, सिका ई- मोटर्स प्रायव्हेट लिमीटेड व गोदावरी फाऊंडेशनचे हृदयालय हे सहप्रायोजक आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे