मराठवाडामहाराष्ट्र

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीने,आज पंढरपूरमध्ये 216 व्या महिलेचे जट निर्मुलन

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती पुणे जिल्ह्यातर्फे आज पंढरपूरमध्ये 216 व्या महिलेचे जट निर्मुलन.

माढा तालुक्यातील भुताष्टे गावातील शोभा यादव यांच्या डोक्यात गेल्या 5 वर्षापासुन जट झाली होती. त्यांनी शेजारील, गावातील, नातेवाईक मंडळींना जटविषयी विचारले पण प्रत्येकाने वेगवेगळ्या गोष्टी सांगुन मनात भय निर्माण केलं. त्यांच्या मनात जटेसोबत अंधश्रध्दा, भीती वाढत जात होती मात्र या जटेमुळे शारिरिक त्रास वाढत असल्यामुळे त्या, त्यांचा नवरा, बहीण इत्यादी मंडळी त्यावर उपाय शोधत होते.

अशातच जट निर्मुलनाचा व्हिडिओ त्यांची बहीण उज्ज्वला जाधव यांनी पाहिला आणि माझा नंबर मिळवून संपर्क केला. या दिवाळीमधे बहिणीला जटमुक्त करायचे असा उज्ज्वलाने चंग बांधला. आज भाऊबीजच्या निमित्ताने शोभा यादव यांची जट काढायचे ठरवले. जवळजवळ चार किलोचा फणा असलेली जट.. जी काढण्यासाठी उचलताना माझा हात अवघडत होता, शोभाताई कश्या सहन करत असतील काय माहित.. पण जट काढून झाल्यावर त्यांच्या डोक्याचा भार हलका झाला.. आणि डोळ्यात आनंदाश्रू तरळले.. ते पाहून उपस्थित सर्वच भाऊक झाले होते.

पंढरपूर येथील अंनिस कार्यकर्ते सोहम व्होरा यांच्या घरी हे जट निर्मूलन करण्यात आले. याप्रसंगी सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष विनायक माळी, पुण्यातील कार्यकर्ते नितीन हांडे, पंढरपूर मधील कार्यकर्ते सोहम व्होरा सितारा शहा, साजिरी शहा, सलोनी व्होरा, संगीता व्होरा इत्यादी उपस्थित होते. तसेच उज्ज्वला जाधव, गजानन यादव, सोमनाथ जाधव, लक्ष्मी जाधव इत्यादी शोभा यादव यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे