महाराष्ट्रराजकीय

फडणवीसांच्या विरोधात तक्रार दाखल; पक्षातील माजी आमदारानेच केला गंभीर आरोप

मंगळवारी भाजपच्या एकेक नेत्याच्या विरोधात ईडीकडे पुराव्यानिशी तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा गोटे यांनी दिला आहे.

मुंबई : आजपासून विधिमंडळ अधिवेशन चालू झाले आहे. आणि राज्य सरकार व भाजपमध्ये पहिल्याच दिवशी चांगली जुंपली आहे. यावेळी भाजपने नवाब मलिक यांच्या राजीनाम्याचा मुद्दा घेऊन महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे.

याप्रसंगी भारतीय जनता पक्षाला १० कोटींची देणगी की खंडणी दोन वेळा देण्यात आली आहे. त्यामुळे अतिरेक्यांशी संबंध जोडून ईडी (ED) जर मंत्री नवाब मलिक यांना अटक करू शकते. तर तोच न्याय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही लावण्यात यावा, अशी मागणी भाजप माजी आमदाराने इडीकडे केली आहे. त्यामुळे भाजपचे माजी आमदार अनिल गोटे यांनी आज मुंबई येथील ईडी कार्यालय जाऊन भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. 

 तसेच यावेळी त्यांनी सांगितले की, आज तक्रार दिल्यानंतर मी ८ दिवस वाट पाहणार आहे. त्यानंतर मी दर मंगळवारी भाजपच्या एकेक नेत्याच्या विरोधात ईडीकडे पुराव्यानिशी तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा गोटे यांनी दिला आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे