पाचोऱ्यात कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली; मृत्यूचे गुढ मात्र अद्यापही कायम..
पाचोरा शहरातील समर्थ पेट्रोल पंपाजवळ कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या अज्ञात मृतदेहाची ओळख अखेर पटली आहे. असे मयत इसमाचे नाव विष्णू युवराज दुधे (पाचोरा तालुक्यातील सार्वे प्र.) असून त्याच्या नातलगांमुळे ओळख पटली आहे. दरम्यान, तरीही नातलगांची ‘डीएनए’ चाचणी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, अद्यापही या मृतदेह मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. पाचोरा पोलिसांची तपासी पथके या खुनाचा उलगडा करण्यासाठी तपास करीत.
काल दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास पाचोरा शहरातील समर्थ पेट्रोल पंपाजवळच्या उमिया मार्बल समोरील हिरव्या गवतात अनोळखी इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्या स्थळावरून मृतदेह ताब्यात घेत जागेची पाहणी करत पंचनामा केला होता त्यात त्यांना एक जिओ कंपनीचा मोबाईल आढळून आला होता, सदर मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्याची दुर्गंधी पसरलेली होती, मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृतदेहावरून ओळख पटविण्यासाठी मोठी अडचण पोलिसांसमोर येत असतानाच जिओ कंपनीचा बंद अवस्थेत आढळून आलेला मोबाईल दुरुस्त करण्याचा निर्णय पाचोरा पोलिसांनी घेतला, तातडीने सदर मोबाईल दुरुस्त करून, मोबाईल सुरु करण्यात आला, त्यातील नंबरचा आधार घेत शोध घेतला असता सदर मृतदेह पाचोरा तालुक्यातील सार्वे प्र. बो.येथील विष्णू युवराज दुधे वय 31 याचा असल्याचा समोर आले आहे, सदर युवक हा सिल्लोड तीन वर्षांपासून कामानिमित्त गेलेला होता तर त्याची पत्नी ही दोंडाईचा येथे राहत होती, मात्र युवक पाचोरा येथे अशा अवस्थेत आढळून आल्याने युवकासोबत नेमके काय, कसे, केव्हा झाले हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. पाचोरा पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात असली तरी सदर युवकाच्या DNA मेडिकल रिपोर्ट साठीची पुढील कारवाई केली जाणार असून त्याच्या नातेवाईकांकडे मृतदेह सुपूर्द करून नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यविधी होणार आहे. पाचोरा पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ सर्व बाबी समोर ठेवत कुजलेल्या अवस्थेत कधीही ओळख न पटू शकणारा मृतदेहाची ओळख काही तासातच पटविल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे, यात पोलीस उपअधीक्षक धनंजय येरुळे, पोलीस निरीक्षक राहुल खताळ, पीएसआय योगेश गणगे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेशक पथक प्रमुख पोलीस हवलदार मल्हार देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल सदीप भोई, प्रकाश शिवदे, योगेश पाटील, अशांच्या पथकाने भयानक अवस्थेत असलेल्या मृतदेहावरून युवकाचा शोध घेतल्याने त्यांचेही कौतुक होत आहे.



